शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयातील परिचराला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 01:47 IST

परिचर मंगेश गावले नेहमीप्रमाणे कार्यालयातील कामे करीत असताना अचानक लाल माकडांचा कळप कार्यालयात शिरला. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी मंगेश गावले यांच्या हाताला चावा घेत जखमी करण्यात आले.

ठळक मुद्देलाल माकडांचा धुडगूस : फायलींची पळवापळवी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पर्यटनस्थळावर हैदोस घालणाऱ्या लाल माकडांनी त्यांचा मोर्चा आता शासकीय कार्यालयांकडे वळविला आहे. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास अप्पर प्लेटो स्थित जिल्हा परिषद सिंचन उपविभागातील कर्मचाºयाला माकडाने चावा घेऊन रक्तबंबाळ केले.परिचर मंगेश गावले नेहमीप्रमाणे कार्यालयातील कामे करीत असताना अचानक लाल माकडांचा कळप कार्यालयात शिरला. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी मंगेश गावले यांच्या हाताला चावा घेत जखमी करण्यात आले. कार्यालयात उपस्थित जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने, ईश्वर राठोड, मालती तायडे, पी.एन. ढोकणे, उपकोषागार कार्यालयाचे पांडे व सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर उपचार करण्यात आला.लाल माकडांच्या हैदोसापासून सुटका व्हावी, यासाठी नागरिकांनी वनविभाग आणि नगरपालिकेला पत्र दिले आहे. मात्र, या मोहिमेला अद्याप मुहूर्त लाभला नाही. माकडांनी स्थानिक नागरिक, पर्यटकांपाठोपाठ शासकीय कार्यालयाकडे मोर्चा वळविल्याने कर्मचाºयांमध्ये दहशत पसरली आहे.उड्या मारत फायली पाडल्याकार्यालयीन वेळ असल्याने कर्मचारी अधिकारी आपल्या कामात व्यस्त होते. अचानक शिरलेल्या माकडांनी खाण्यासाठी काही मिळते का, याचा शोध घेतला. मात्र, काहीच मिळत नसल्याने एका खोलीतून दुसºया खोलीत जाताना टेबलावरून अलमारी, खुर्च्यांवर उड्या मारल्या. त्यामुळे उपस्थित कर्मचारी घाबरले. कर्मचाºयांनी मोठ्या हिमतीने हातात काठ्या घेऊन या माकडांना हुसकावून लावले. या माकडांची चिखलदरा शहरात दहशत कायम आहे.

टॅग्स :Monkeyमाकड