शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
3
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
8
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
9
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
10
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
11
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
12
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
13
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
14
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
15
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
16
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
17
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
18
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
20
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!

शासकीय भूखंड गेला चोरीला!

By admin | Updated: October 24, 2015 00:01 IST

‘कायद्याचं बोला’ या मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचा प्रसंग रंगविण्यात आला होता.

७/१२ वर नोंद : प्रशासनाची शोधाशोध, जमीन दडपली कोणी?प्रदीप भाकरे अमरावती‘कायद्याचं बोला’ या मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचा प्रसंग रंगविण्यात आला होता. ‘ती’ विहीर चोरीला गेल्याची तक्रार केली जाते आणि पुढे तिची शोधाशोध सुरू होते. शहरातील एका भूखंडाबाबत असाच काहीसा प्रकार घडल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. ७/१२ वर नोंद असलेला ०.३९ आर. क्षेत्रफळाचा भूखंड शासकीय मोजणीदरम्यान आढळूनच आला नाही. जिल्हा प्रशासनासह महसूल, नगररचना आणि भूमीअभिलेख कार्यालयाने पंधरवड्यापासून या भूखंडाची शोधमोहीम आरंभली आहे. ७/१२ वर नोंद असलेला ०.३९ आर. भूखंड गेला कुठे, याचे उत्तर कुणाचजवळ नाही. त्यामुळे मोजणी होऊनही त्या भूखंडाचा शोध लागत नसल्याने भूखंड चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी ‘बीएसएनएल’च्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार, त्यानंतर पोलीस बंदोबस्तात पाडलेले अतिक्रमण तथा उभय पक्षांकडून झालेल्या तक्रारीची पार्श्वभूमी या भूखंड चोरीप्रकरणाला आहे. मौजा पेठ अमरावतीमधील गट क्र. ४९/२ या ४.४१ हेक्टर क्षेत्रातील ०.३९ आर भूखंड बेपत्ता आहे. बीएसएनएल (टेलिकॉम) आयुक्त, अमरावती विभाग, आयकर विभाग, मनोविकास स्पेशल चिल्ड्रेन एज्युकेशन सोसायटी आणि राणा एज्युकेशन सोसायटीला मंजूर भूखंड मोजून दिल्यावर त्याच अभिन्यासामधील ०.३९ आर भूखंड शिल्लक असावयास हवा होता. तथापि, शासकीय दस्तऐवज असलेल्या ७/१२ वर अस्तित्वात असलेला हा भूखंड प्रत्यक्षात दिसेनासा झाला आहे. गाव नमुना ७ वर ‘ई-क्लास महाराष्ट्र शासन ०.३९’ अशी नोंद आहे. मात्र, मोजणी झाल्यानंतरही प्रत्यक्ष जागेवर ०.३९ आरचा खुला भूखंड तेथे उपलब्ध नाही.असे झाले वाटप २ फेब्रुवारी २००८ ला अभिन्यास मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी १४ फेब्रुवारी २००१ मध्ये ०.८१ आर भूखंड बीएसएनएलला, २१ डिसेंबर २००३ला १.२१ हेक्टर आयकर विभागाला, ०.१३ आर मनोविकास स्पेशल चिल्ड्रेन एज्युकेशन सोसायटीच्या नावे करण्यात आला. सन २०१० मध्ये श्री राणा एज्युकेशन सोसायटीला यातील २ हेक्टर जागा देण्यात आली आहे.तक्रारीची पार्श्वभूमीबीएसएनएलच्या जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. प्रत्यक्षात कमी जागा मिळाल्याची तक्रार संबंधितांकडून करण्यात आली. त्यानुसार मोजणी केल्यानंतर ७/१२ वर शिल्लक असणारी ०.३९ आर. जागा प्रत्यक्षात दिसत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. ०.३९ आर. क्षेत्रफळाचा भूखंड असायलाच हवा. ती जागा शोधण्यासाठीच मोजणी करण्यात आली. त्यासंबंधीचा अहवाल २-३ दिवसांत प्राप्त होईलच. ०.३९ आर. जागेची नोंद ७/१२ वर आहे. चौकशी सुरू आहे. वस्तुस्थिती बाहेर येईलच.- शंकर सिरसुध्दे,उपजिल्हाधिकारी, महसूल.जागेचा मेळ बसत नसल्यामुळेच राणा एज्युकेशन सोसायटीला अद्यापपर्यंत जागेचा ताबा देण्यात आलेला नाही. ई-क्लास जमिनीचे ले-आऊट पाडण्याचे अधिकार मनपाला नाहीत.- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती.