शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कामबंद आंदोलनाने शासकीय आरोग्य यंत्रणा कोलमडली

By admin | Updated: July 2, 2014 23:11 IST

राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयीन यंत्रणा कोलमडली आहे. बुधवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही निगरगट्ट प्रशासनाने अद्यापर्यंत

अमरावती : राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयीन यंत्रणा कोलमडली आहे. बुधवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही निगरगट्ट प्रशासनाने अद्यापर्यंत कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे आरोग्य सेवा पुरविण्यास यंत्रणा तोकडी पडत असून रुग्णांचे बेहाल झाले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या मागील कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेच्यावतीने उपोषण सुरु करण्यात आले आहे. या कामबंद आंदोलनामुळे जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सुमारे ३५ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. मात्र त्यापैकी ५ वैद्यकीय अधिकारीच आरोग्य सेवा देत आहेत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अतिदक्षता कक्ष, साथरोग विषयक कामकाज अशा अनेक विभागात आरोग्य सेवा देण्यास यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णांवर उपचार होण्यास दिरंगाई होत आहे. असेच हाल जिल्हा स्त्री रुग्णालायतही पाहायला मिळत असून केवळ आपत्कालीन यंत्रणा तेथे कार्यरत ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रसूतीकरिता आलेल्या महिलांकडे दुर्लक्ष होत आहे.आधीच वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त पदे आहेत. त्यातच कामबंद आंदोलन सुरु असल्याने रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणारी सर्व यंत्रणा कोलमडली आहे. बुधवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आंदोलन चिघळण्याचे संकेत दिसत आहे. आंदोलन लवकरच न संपल्यास जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आरोग्य सेवा पूर्णपणे ढासळण्यास शासनच कारणीभूत ठरणार आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शासनाविरुध्द तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या आंदोलनात संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी प्रमोद रक्षमकर, एकनाथ भोपळे, महिला सचिव उज्ज्वला पाटील, उमाकांत गरड, अश्विन पाटील, राजेश गायकवाड यांच्यासह आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आंदोलनात सहभाग आहे. (प्रतिनिधी)