शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘ओडीएफ’कडे दमदार पाऊल, १८ हजार स्वच्छतागृहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 16:30 IST

 अमरावती -  सन २०१८ च्या पूर्वार्धात होणा-या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या शंभरात येण्यासाठी महापालिकेने पूर्वतयारीला गती दिली आहे. याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात १२,४२४ वैयक्तिक शौचालयांसह तब्बल १८,२५६ शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी अमरावती महापालिकेचे नगरविकास विभागाकडून खास कौतुकही करण्यात आले आहे. संपूर्ण विदर्भात महापालिकेने स्वच्छतागृहाबाबतीत रेकॉर्डब्रेक कार्यपूर्ती केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

 अमरावती -  सन २०१८ च्या पूर्वार्धात होणा-या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या शंभरात येण्यासाठी महापालिकेने पूर्वतयारीला गती दिली आहे. याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात १२,४२४ वैयक्तिक शौचालयांसह तब्बल १८,२५६ शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी अमरावती महापालिकेचे नगरविकास विभागाकडून खास कौतुकही करण्यात आले आहे. संपूर्ण विदर्भात महापालिकेने स्वच्छतागृहाबाबतीत रेकॉर्डब्रेक कार्यपूर्ती केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आकारास आलेले स्वच्छ भारत अभियान राज्यातही राबविले जात आहे. त्याअनुषंगाने गतवर्षीपासून ‘स्वच्छ सर्वेक्षण’ ही देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या स्पर्धेंतर्गत हागणदारीमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक, कचरा संकलन आणि सार्वजनिक स्वच्छतेसह अन्य पूरक बाबींचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१७ च्या अनुषंगाने अमरावती शहर तब्बल २३१ व्या क्रमांकावर राहिले. त्यावेळी आलेल्या क्युसीआयने टीमने शहराची स्वच्छतेविषयक पाहणी केली होती. त्यावेळीही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित नसल्याने शहराचे मानांकन माघारले होते. यंदा जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत तपासणी होईल. त्याअनुषंगाने महापालिकेने दमदार पावले उचललण्यास सुरूवात केली आहे. त्यापार्श्वभूमिवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची डीपीआर बनविणे सुरू असून अकोली आणि बडनेरा येथेही प्रत्येकी २५ टन क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमिवर शौचालयांच्या तुलनेत व्यवस्थापन आणि विलगीकरणावर भर दिला जाणार आहे. दरम्यान आतापर्यंत ‘एसबीएम’ मधून तब्बल १२,४२४ वैयक्तिक शौचालये बांधण्यात आल्याने शहराची वाटचाल हागणदारीमुक्त शहराकडे सुरू झाल्याचे सुखद चित्र आहे. सर्व प्रकारची स्वच्छतागृहांवर भरपाचही झोनमधील १२,९०६ लाभार्थ्यांना ८,५०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता, ११,३९० लाभार्थ्यांना ६,५०० व ३,५०० रुपयांप्रमाणे उर्वरित हप्ते देण्यात आले. आतापर्यंत १२४२४ शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पैकी १२,३९८ शौचालयांचे जिओटॅगिंग करण्यात आले. सार्वजनिक शौचालयात १,६१७ शिरस, तर १९८ शिरस पैसे देऊन शौचालय वापरण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत. २४८ शिरस माध्यमातून सामुदायिक शौचालये उभारण्यात आलीत. याशिवाय आधी विविध योजनांमधून ५,८३२ वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्यात आले आहेत. 

टॅग्स :Governmentसरकार