शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आनंदात निघाले मेळघाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:19 AM

मेळघाटच्या नावाने घाबरणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी ‘मिशन मेळघाट’वर जाण्यापूर्वीच परतवाड्यात गरम चहाचा आनंद घेत होते.

ठळक मुद्देथंड मेळघाट, गरम चहा : ध्येय एकच, मात्र नावे वेगवेगळी

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : मेळघाटच्या नावाने घाबरणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी ‘मिशन मेळघाट’वर जाण्यापूर्वीच परतवाड्यात गरम चहाचा आनंद घेत होते. घाटवळणाच्या नागमोडी रस्त्यावरून उंच पहाडामध्ये असलेल्या आदिवासी खेड्यांत एकाच ध्येयपूर्तीसाठी जिल्हा परिषदेचे हजारांवर कर्मचारी आनंदात रवाना झाले.धारणी किंवा चिखलदरा तालुक्यात बदली झाली की, अनेकांना नको तो आजार जडतो. नातेसंबंध आठवायला लागतात. काहींचे नातलग आजारी होतात, यावरही कळस म्हणजे, राजकारण्यांच्याही चरणी जाणाºयांची संख्याही कमी नाही. परतवाडा विश्रामगृहासमोर सोमवारी चित्र मात्र पूर्णत: विपरीत दिसून आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, कृषी, बालविकास, बांधकाम, पाटबंधारे, पशुसंवर्धन, स्वच्छता मिशन एक नव्हे सर्वच विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रसन्न मनाने मेळघाटात जाताना दिसले.सीईओंच्या गोपनीय भेटी..: तीन दिवस मेळघाटात अख्खे प्रशासन घेऊन जाणारे जिल्हा परिषदेचे सीईओ किरण कुलकर्णी आपल्यासह काही महत्त्वपूर्ण अधिकाºयांच्या दौºयाबाबत गोपनियता ठेवली. उद्दीष्ठपूर्ती असलेल्या ९९ गावांमध्ये केव्हाही भेटी देऊन तपासणी व आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करीत अडचणीवर मात करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.औषध, बिस्तरे सोबत...: सोमवारपासून तीन दिवस मुक्कामी गेलेल्या दीड हजारांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार औषधे, कपडे, गरम कपडे आदी साहित्य सोबत नेले. काहींनी मेळघाटच्या गावामध्ये अनेक वर्षे काढलेली होती, तर काहींना मेळघाट नवीन होता. चांगल्या कामासाठी प्रसन्न मनाने जात असल्याचे अनेक अधिकाऱ्यांनी सांगितले. नावे वेगवेगळी असली तरी उद्दिष्ट मात्र एकच होते.‘लोकमत'मुळे मिळाली ऊर्जासोमवारी सकाळी ७ वाजतापासून वाहनांचा ताफा साहित्य घेऊन आपल्या कर्तव्यावर निघत होता. ‘लोकमत’च्या वृत्तांनी आम्हाला वेगळी उर्जा मिळाल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाºयांनी आवर्जून उल्लेख केला.