शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गोंडविहीर धरणाच्या मुख्यसंरक्षक भिंतीला तडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 16:48 IST

गाळ नेणाऱ्यांनी चक्क पिचिंगच्या दगडांसह धरणाची मुख्य भिंतच पोखरून काढली आहे.

अनिल कडू। 

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील गोंडविहीर धरणाच्या मुख्यसंरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. धरणाच्या मुख्य भिंतीलगत गाळाचा उपसा करण्यात आला आहे. गाळ नेणाऱ्यांनी चक्क पिचिंगच्या दगडांसह धरणाची मुख्य भिंतच पोखरून काढली आहे.धरणाच्या भिंतीपासून दोनशे मीटरच्या आता नो एन्ट्री झोनमध्येही गाळ नेणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. यात प्रकल्पाची स्थिती गंभीर बनली आहे. गौरखेड्यासह परतवाड्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात धरण फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अचलपूर तालुक्यातील मल्हारा गावालगत गोंडविहीर प्रकल्प १९७७ मध्ये अस्तित्वात आला. आज या धरणाच्या मुख्य भिंतीवरच मोठमोठी झाडे उभी ठाकली आहेत. भिंतीवर आणि गेटजवळ पोहचण्याकरिता असलेल्या पायºया नष्ट झाल्या आहेत. धरणातून पाणी बाहेर सोडण्याच्या गेटजवळील पाण्याचा मार्ग बंद पडला आहे. गाळाने बुजला आहे. त्याच्या दोन्ही बाजूच्या भिंतीही खचल्या आहेत. या मार्गातही मोठमोठी झाडे उभी आहेत. अनेक वर्षांपासून गेटसह प्रकल्पच दुर्लक्षित आहे. धरणाची स्थिती बघता अनेक वर्षांपासून धरणाची प्रत्यक्षात देखभाल व दुरूस्तीच केली गेलेली नाही. धरणाची माहिती देणारा नामफलकही धरणस्थळी नाही. धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीला आतल्या बाजूला दगडी पिचिंग नाही. प्रकल्पावर लक्ष ठेवण्याकरिता स्थानिक पातळीवर एकही कर्मचारी तैनात नाही. पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित हा प्रकल्प लोकहितास्तव उपयुक्त असून बिच्छन नदीवर आहे. ही बिच्छन नदी गौरखेड्यासह परतवाडा शहराच्या मध्यभागातून वाहते. पावसाळ्यात दरवर्षी प्रकल्प पाण्याने पूर्णपणे भरतो. तेव्हा याच बिच्छन नदीला तीन ते चार मोठे पूरही जातात.गोंडविहीर प्रकल्प एप्रिल २०१६ पासून मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूरकडे आला आहे. धरणाच्या मुख्यसंरक्षण भिंतीला तडे गेल्याची, प्रकल्पाची स्थिती गंभीर असल्याची माहिती आर. एस. मोहिते सहायक अभियंता श्रेणी-१ यांनी स्थानिक प्रशासनासह वरिष्ठांना दिली आहे. प्रकल्पातून गाळ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. गाळ नेणाºयावर कारवाई करण्यास त्यांनी पोलिसांना सुचविले आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता र. कृ. ढवळे यांनी कार्यकारी अभियंता उ. ज. क्षीरसागर व सहायक अभियंता आर. एस. मोहिते यांच्या समवेत प्रकल्पाची पाहणी केली असता, तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांनी प्रकल्पस्थळीच स्थानिक अधिकाºयांना दिल्या आहेत.प्रकल्पातून होणाºया सिंचनाच्या वसुलीतून ४० टक्के खर्चच दुरूस्ती व देखभालीवर करता येतो. प्रत्यक्षात मात्र, या प्रकल्पावर सिंचनच नाही. सिंचन नसले तरी लोकहितकारी या प्रकल्पाची देखभाल व दुरूस्ती आवश्यक ठरते. प्रकल्पाची स्थिती गंभीर असली तरी प्रकल्पाच्या सुरक्षिततेला धोका नाही. डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन आणि मेरीच्या तज्ज्ञांकडून प्रकल्पाची तपासणी करून घेण्यात येईल.- आर. एस. मोहिते, सहायक अभियंता श्रेणी-१ , मध्यम व लघु पाटबंधारे विभाग, अचलपूर 

टॅग्स :DamधरणAmravatiअमरावती