अमरावती : लग्नकार्यातून घरी पायदळ येत असताना एका महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार किमतीची ३५ ग्रॅमची सोन्याची चेत अज्ञात आरोपीने हिसकली व पळून गेल्याची घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील नानक नगर रामपुरी कॅम्प येथे गुरूवारी घडली.
फिर्यादी मनीष रामचंद्र कुंदवानी (३३, रा. नानक नगर रामपुरी कॅम्प) यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली. फिर्यादी यांची आई ही परिसरातच लग्नाकरिता गेल्या होत्या. तेथून त्यांच्या मैत्रिणीसोबत घरी परत येत असताना एक युवक समोरून आला व त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने हिसकली. त्यानंतर समोर उभी असलेल्या दुचाकीवर बसवून पळून गेला. महिलेने आरडाओरड केली. त्यानंतर पोलिसांत धाव घेऊन त्यानी तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल नरेंद्र ढोबळे करीत आहेत.