शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

देवी रुक्मिणीची पालखी यंदाही जाणार पंढरपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 14:22 IST

सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन वारीवर काहीशी मर्यादा आली; मात्र महत्त्वाच्या पालख्या योग्य ती दक्षता घेऊन आणण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यात कौंडण्यपूरच्या पालखीचा समावेश आहे.

ठळक मुद्दे४२५ वर्षांची परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देवी रुक्मिणीचे माहेर असलेल्या कौंडण्यपूर येथील पालखी यंदाही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार आहे. सव्वाचारशे वर्षांच्या पालखी परंपरेत कोरोनाच्या संकटकाळातही खंड पडणार नाही. आवश्यक ती दक्षता घेऊन पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. यासंदर्भात पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी कौंडण्यपूर स्थित श्री विठ्ठल-रुखमाई संस्थानला पत्राद्वारे कळविले आहे.

आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त १ जुलै रोजी आषाढी वारी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणार आहे. येथे प्रमुख संतांच्या पादुकांचा श्री पांडुरंगास भेटीचा सोहळा असतो. त्यानिमित्त राज्यभरातून पालख्या पंढरपूरला येत असतात. सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन वारीवर काहीशी मर्यादा आली; मात्र महत्त्वाच्या पालख्या योग्य ती दक्षता घेऊन आणण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये राज्यातील नऊ पालख्या आहेत. त्यात कौंडण्यपूरच्या पालखीचा समावेश आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी तसे पत्र श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुखमाई संस्थानच्या विश्वस्तांना पाठवले आहे.आषाढी यात्रेचा कालावधी आषाढ शुक्ल प्रथम (२२ जून) ते आषाढ शुक्ल १५ (५ जुलै) असा राहणार आहे. माता रुक्मिणीची पालखी घेऊन येणाऱ्या भाविकांची नावे मंदिर समितीस कळविण्याबाबत पत्र संस्थानला देण्यात आले आहे. त्यानुसार समितीतर्फे येणाऱ्या भाविकांना प्रवेशपत्रिका दिल्या जाणार आहेत.

पालकमंत्र्यांचा पाठपुरावाकौंडण्यपूर येथील ४२५ वर्षांची प्राचीन परंपरा अखंडित राहावी, यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने पालखीला मान्यता दिली. देवी रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला जाणार असल्याने विदर्भातील वारकरी, भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे.

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा