हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा...आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी शहरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी होती. सकाळपासूनच विठोबाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तगणांची पाऊले मंदिरांकडे वळत होती. शहरातील बुधवारा परिसरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात आपल्या कुटुंबासह नतमस्तक होताना ही महिला. आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी महिलांनी विठोबाला साकडे घातले.
हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 00:44 IST