शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वैभवशाली जिनिंग प्रेसिंग झाली भकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:01 IST

तालुक्यातील एकमेव पणन महासंघाची जिनिंग-पे्रसिंग भंगार अवस्थेत असून, कापूस खरेदी केंद्राअभावी या जिनिंग-प्रेसिंगला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देपणन महासंघाच्या धोरणांचा फटका : शेतकऱ्यांचे पांढरे सोने खासगी व्यापाºयांकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील एकमेव पणन महासंघाची जिनिंग-पे्रसिंग भंगार अवस्थेत असून, कापूस खरेदी केंद्राअभावी या जिनिंग-प्रेसिंगला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील पांढरे सोने खासगी व्यापाऱ्यांना पडत्या भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. या जिनिंग-प्रेसिंगला अच्छे दिन केव्हा येणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.एकेकाळी नगदी पीक म्हणून तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रामाणात घेतले जात होते. त्यामुळे अमरावती येथे कापूस एकाधिकार मंडळाची बाजारपेठदेखील प्रसिद्ध होती. काळी कसदार जमीन व अनुकूल वातावरणामुळे कापसाचे उत्पादन तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत होते. घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, देऊरवाडा येथील कापसाची प्रत संपूर्ण जिल्ह्यात उच्च मानली जायची. अमरावती येथील कापूस खरेदी केंद्रावर या गावांच्या नावानेच कापसाला चांगले भाव मिळत होते. ब्रिटिश काळात चांदूर बाजार येथे पांगरकर यांचे जिनिंग होते, असे सांगितले जाते. सहकार विभागातून तत्कालीन आमदार भैयासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात पहिल्यांदा सहकारी तत्त्वावर जिनिंग-प्रेसिंग तयार करण्यात आली. गुजरातमधून सन १९०६ मध्ये प्रेसिंग मशीन आणण्यात आली. येथे तयार होणाºया कापसाच्या गाठी सर्वात उत्तम मानल्या जायच्या. त्यानंतर ती जिनिंग-प्रेसिंग पणन महासंघाने खरेदी केली.कृषी विभाग दखल घेणार काय ?या परिसरात आजही दर्जेदार कापसाचे उत्पादन होते. पूर्णा व चारघड प्रकल्पामुळे ओलिताची सोय असल्यामुळे अचलपूर येथील फिनले मिलला लागणारा उच्च प्रतीचा, लांब धाग्याचा कापूस येथे उत्पादित होऊ शकतो.याबाबतच मर्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने पाऊल उचलणे गरजेचे आहे.जिनिंग खासगी व्यक्ती चालविते भाडेतत्त्वावरया जिनिंग-प्रेसिंगमध्ये शेकडो मजुरांना रोजगार मिळत होता तसेच शेतकऱ्यांना आपला कापूस विकण्यासही सोयीचे झाले होते. कापसाचा एकाधिकार असताना या प्रेसिंगचे वैभव पाहण्याजोगे होते. पणन महासंघाने या प्रेसिंगमध्ये रेचे लावले होते. परिसरात कापसाच्या गाठी ठेवण्यासाठी मोठे गोडाऊन बनविले होते. त्याकाळी परिसराचे वैभव मानली जाणाºया या-जिनिंग प्रेसिंगची आज दुर्दशा झाली आहे. पणन महासंघाच्या चुकीच्या धोरणांमुळे ही जिनिंग-प्रेसिंग खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.