शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:35 IST

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेती व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले,....

ठळक मुद्देजिल्हाकचेरीवर धडक : शहर काँग्रेस, मराठा सेवा संघ, भारत कृषक समाजाची मागणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेती व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले, अशा थोर पुरूषाचे नाव बेलोरा विमानतळाला देण्यात यावे, पूर्णाकृती पुतळा उभारावा, तसेच भारतरत्न द्यावे. या मागण्यासाठी मंगळवारी शहर काँग्रेस, मराठा सेवासंघ, भारत कृषक समाजाच्यावतीने आरडीसी नितीन व्यवहारे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.भाऊसाहेबांनी नावलौकिक कार्याची दखल घेऊन शहर काँग्रसेचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्या मार्गदर्शनात २७ डिसेंबर रोजी शहर जिल्हा काँग्रेसने वरील मागण्यांविषयी ठराव पारित केले होते. राज्यातील तमाम भावना लक्षात घेता शासन दरबारी पोहोचविण्यासाठी शहर काँग्रेस कमिटी, मराठा सेवा संघ, भारत कृषक समाजाने याकडे शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान या मागणीसंदर्भात किशोर बोरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, भारत कृषक समाजाच्या शहराध्यक्ष मयुरा देशमुख, माजी कुलगुरू गणेश पाटील, मनपा गटनेता बबलू शेखावत आदींनी या मुद्यावर विचार मांडले. सोबतच भीमा कोरेगाव येथे समाजकंटकाकडून झालेली दगडफेक व जाळपोळीचा व केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधानावर केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, चंद्रकात मोहिते, मयुरा देशमुख, बबलू शेखावत, विलास इंगोले, भैय्या पवार, सुरेश रतावा, पुरूषोत्तम मुंदडा, गणेश पाटील, प्रल्हाद ठाकरे, प्रशांत डवरे, सुधाकर तलवारे, एकनाथ गावंडे, बी.आर देशमुख, अभिनंदन पेंढारी, नसीम खान, किशोर रायबोले, अनिल माधोगडीया, भैय्यासाहेब निचळ, सत्यप्रकाश गुप्ता, अर्चना सवाई, वृषाली वाकोडे, कल्पना वानखडे, मनाली तायडे, शीला पाटील, तेजस्विनी वानखडे, प्रतिभा रोडे, करीमा बाजी, शोभा शिंदे, राजेश चव्हाण, दिपलसिंग सलुजा, आनंद भामोरे, मो सादिक सौदागर, देवयानी कुर्वे, राजीव भेले, उज्ज्वला पांडे, राजेश देशमुख, ज्ञानेश्र्वर कुर्वे, संजय बोबडे,राहूल येवले आदी उपस्थित होते.लोकांच्या भावनेशी निगडित विषयशिक्षण महर्षी, भारतीय कृषी क्रांतीचे जनक, भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे कार्यकर्तृत्व सर्वश्रृत आहे. त्यामुळे बेलोरा विमातळाला भाऊसाहेबांचे नाव, भारतरत्न देण्याची मागणी महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या भावनेशी निगडित आहे. त्यामुळे यावर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे. ही मागणी गांधीवादी मार्गाने केली जात आहे. यासाठी आंदोलनाची वेळ येऊ नये, असा आशावादही उपस्थितांनी व्यक्त केला.