शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

"महिला, मुलींना सुरक्षेसाठी लायसन्स द्या, मी रिव्हॉल्व्हर देतो", शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची मागणी

By गणेश वासनिक | Updated: August 25, 2024 16:52 IST

Amravati News: सरकारने महिलांना रिव्हाल्वर हाताळण्याची परवानगी द्यावी, अमरावतीत परवानगी दिल्यास मी रिव्हाल्वर घेऊन देतो, असे वादग्रस्त वक्तव्य मूर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा शिंदे सेनेचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी रविवारी येथे केले.

- गणेश वासनिक अमरावती - देश, राज्यात महिला-मुलींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे. अशा घटना रोखण्यासाठी शासन त्या-त्या स्तरावर प्रयत्नरत आहे. मात्र मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली असून, सरकारने महिलांना रिव्हाल्वर हाताळण्याची परवानगी द्यावी, अमरावतीत परवानगी दिल्यास मी रिव्हाल्वर घेऊन देतो, असे वादग्रस्त वक्तव्य मूर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा शिंदे सेनेचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी रविवारी येथे केले.

बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचारविरोधात अमरावती येथे नेहरू मैदान ते ईर्विन चौक या दरम्यान सकल हिंदू समाजाच्यावतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना नानकराम नेभनानी यांनी वादग्रस्त वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली. नेभनानी एवढ्यावरच थांबले नाहीत तर अत्याचार रोखताना मुली-महिलांच्या हातून दोन-तीन लोकं मेले तरी चालेल पण चुकीचा माणूस वाचू नये, त्याचं मी समर्थन करेल. त्यामध्ये लागणाऱ्या कोर्ट कचेरीचा संपूर्ण खर्च मी करेल, असेही ते म्हणाले. ‘त्या’ मुली-महिलांच्या कुटुंबीयावर काही आले तर त्यासाठी मी समोर राहील, असा विश्वास देखील नेभनानी यांनी दिला. नेभनानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळीक आहेत. ते शिंदे सेनेचे मुख्य समन्वयक तथा शिवसेना प्रणित सिंधी समाज राज्य संघटक आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीShiv SenaशिवसेनाWomenमहिला