चिखलदरा : जिल्हाभरातील सेतु संचालक व आधार कार्ड दिवसभरात शेकडो लोकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी संचालकांना कोरोना व्हॅक्सिन दुसऱ्या टप्प्यात देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
कुठलेही शासकीय काम असल्यास सेतु केंद्रावर दररोज नागरिकांची गर्दी ही सर्वश्रुत आहे. आधार ऑपरेटर म्हटल्यावर येणाऱ्या ग्राहकांशी शारीरिक अंतर ठेवणे अशक्य नाही. आधार काढताना किंवा अपडेट करताना दिवसातून किमान ५० ते १०० लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. वरील बाबींचा विचार करता, कोरोना संक्रमण होण्याचा किंवा ऑपरेटर किंवा संचालकांना झाल्यास त्यांच्यापासून इतर लोकांना संक्रमित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी कोरोना व्हॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यात सेतू संचालक, ऑपरेटर, आधार ऑपरेटर त्यांना देण्याची मागणी संचालक पीयूष मालवीय यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.