शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कुडकुडणाऱ्या जीवांना देऊ या ऊब

By admin | Updated: December 21, 2015 00:02 IST

आता थंडीने जोर धरला आहे. अशा कडाक्याच्या थंडीत शहरात अनेक बेघर, अनाथ, गरजू जीव अनेक ठिकाणी कुडकुडताना आढळतात.

लोकमत, वाचकांचा उपक्रम : घरातील लोकरीचे कपडे देण्याचे आवाहनअमरावती : आता थंडीने जोर धरला आहे. अशा कडाक्याच्या थंडीत शहरात अनेक बेघर, अनाथ, गरजू जीव अनेक ठिकाणी कुडकुडताना आढळतात. आपल्या घरात पडून असलेल्या जुन्या उबदार कपड्यांमधून अशा गरजू, निराधारांना ऊब दिली जाऊ शकते. लोकमत वृत्तपत्र समूह व वाचकांना अशा अनाथ, गरजू, वृध्द आणि असहाय्य अवस्थेतील लोकांसाठी उपक्रम राबविण्याचे ठरविले असून या गरजुंना घरातील कपड्यांची ऊब देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लहान मुले तसेच मोठ्यांना वापरता येतील असे गरम, उबदार आणि सुस्थितीतील स्वच्छ कपडे जसे स्वेटर, मफलर, स्कार्फ, चादरी, शाली, ब्लँकेट आदी इच्छुकांनी लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड अमरावती, येथे २५ डिसेंबरपर्यंत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. गोळा झालेल्या या उबदार कपड्यांचे गरजुंना वितरण करण्यात येईल. वाचकांनी या उपक्रमाला हातभार लावावा व आपल्या घरातील एकतरी गरम ऊबदार कपडा थंडीत कुडकुडणाऱ्या लोकांना द्यावा. विविध सेवाभावी संस्थांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी स्वाती बडगुजर (९८५०३०४०८७) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)‘प्रेमाने ऊब द्या ’ उपक्रमात सहभागी महिलाया उपक्रमात भावना कुदळे, व्हीएचपी मातृशक्ती महानगर ग्रुप, माधुरी जोशी, ममता कर्नावर, ओसवाल महिला मंडळ, स्मिता पच्चीकर, गुजराथी समाज महिला मंडळ, नीता मुंदडा माहेश्वरी महिला मंडळ, संगीता खंडेलवाल, खंडेलवाल महिला मंडल, प्रतिभा सकलेचा, ओसवाल बहुसंघ, राणी चौधरी, ललिता कात्रेला, ओसवाल महिला संघ, संजना आंचलिया, विदर्भ महिला अध्यक्ष, भारतीय जैन संघटना, भारती हिंजोचा, लोहाणा महिला मंडळ, संगीता दासानी, जया हरवानी, मममता दादलानी, हसिना शहा, हीम सोसायटी, वैशाली गुल्हाने, ममता काकाणी, उज्ज्वला मालू या महिला व महिला संघटना सहभागी झाल्या आहेत.