शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

राष्ट्रसंतांना ‘भारतरत्न’ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, ही मागणी आता भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजपने याला समर्थन देऊन मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा गुरुदेव भक्तांनी केली आहे.

ठळक मुद्देमहाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर मागणीला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, ही मागणी आता भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजपने याला समर्थन देऊन मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा गुरुदेव भक्तांनी केली आहे‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. अनेक थोर व्यक्ती अजूनही या सन्मानापासून वंचित आहेत. हा सन्मान अजुनही एकाही संताला देण्यात आला नाही. काही संत स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेले. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सन १९०९ पासून सन १९६८ पर्यंत देहरूपाने होते. कार्यरूपाने तर आजही आहेत. या थोर महामानवाला ‘भारतरत्न’ मिळण्याबाबत अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे तुकारामदादा गीताचार्य यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचच्या आवाहनामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये याबाबत ग्रामसभेचे ठराव झाले आहेत. लक्ष्मणदास काळे महाराज, सत्यपाल महाराज, भाऊसाहेब थुटे, राजेंद्र मोहितकर अशा अनेक प्रबोधनकारांनी समर्थन करून जनतेला निवेदने पाठविण्याचे आवाहन केले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार तसेच विदभार्तील अनेक आमदार-खासदारांनी समर्थन करून या मागणीवर पत्रव्यवहार केला. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. लोकसभेत यापूर्वी माजी खासदार महादेवराव शिवणकर, हंसराज अहीर तसेच खासदार अशोक नेते यांनी प्रश्न उपस्थित केला. विधानसभेत तत्कालीन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अशासकीय ठराव मांडला होता. महाराष्ट्र सरकारने शिफारसपत्र पाठविले. केंद्र सरकारच्या गृहविभागाने शिफारस केली. आता १ आॅगस्टला महाजनादेश यात्रेची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह करणार आहेत. यानिमित्त केंद्रातील मंत्री व राज्यातील मंत्रिमंडळात उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात भाजपा सरकारने तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करावा, अशी अपेक्षा गुरुदेवभक्तांची आहेतुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ मिळाले पाहिजे, यासाठी मी शासनस्तरावर पाठपुरावा केला. ही मागणी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांकसुद्धा आहे. सरकारने मागणीची दखल घ्यावी.- यशोमती ठाकूरआमदार, तिवसामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे केंद्र सरकार याबाबत निर्णय घेणार आहे, याबाबत पाठपुरावा सुरू आहे.- निवेदिता चौधरी (दिघडे), प्रदेश सचिव, भाजप

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज