शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुलीने दिला पित्याला खांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:22 IST

वंशाचा दिवा मुलगाच, हा अट्टहास आता मागे पडत आहे. त्यामुळे अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथे वृद्धापकाळाने निधन पावलेल्या वडिलांना मुलीने भडाग्नी दिला. या पुरोगामी व काहीशा धाडसी पावलाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

ठळक मुद्देमल्हारा येथील घटना : पंचक्रोशीत कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : वंशाचा दिवा मुलगाच, हा अट्टहास आता मागे पडत आहे. त्यामुळे अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथे वृद्धापकाळाने निधन पावलेल्या वडिलांना मुलीने भडाग्नी दिला. या पुरोगामी व काहीशा धाडसी पावलाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.मल्हारा येथील हनुमान मंदिरात सुमारे १६ वर्षांपासून पुजारी असलेले विठ्ठलराव ढाकूलकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांना दोन्ही मुली. त्यांची मोठी मुलगी ज्योती प्रमोद शिंगाडे (रा. रविनगर, परतवाडा) यांनी अंत्यसंस्काराचे विधी करून आपल्या वडिलांना भडाग्नी दिला. ग्रामीण भागात फक्त मुलांची हट्ट धरणाऱ्या आई-वडिलांसाठी हे झणझणीत अंजन असल्याच्या प्रतिक्रिया या घटनेच्या अनुषंगाने उमटत आहेत.दरम्यान, विठ्ठलराव ढाकूलकर यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या नातेवाइकांनी मल्हारा गाठले. परंपरेनुसार पुरुषच पार्थिवाला खांदा व अग्नी देत असल्याने, ही जबाबदारी कुणी पार पाडायची, असा प्रश्न नातेवाइकांना पडला. त्यावर वडिलांप्रमाणे पुरोगामी विचारशैली अंगीकारणाऱ्या ज्योती यांनी पुढाकार घेऊन आपण पित्यावर अग्निसंस्कार करणार असल्याचे सांगितले. विठ्ठलराव ढाकूलकर यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.