अमरावती : तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे आम्रपाली महिला बचत गट समूहाने पंचायत समीती अतंर्गत घरकुल मार्ट ही योजना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद यांच्या अभियानामार्फत सुरू केली आहे.
सध्या ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गावोगावी घरकुलाची कामे सुरू आहेत. ही कामे करताना लाभार्थ्यांना बांधकामाचे साहित्यासाठी मोठी कसरत करावे लागत आहे. अशातच साहित्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाच्या बांधकामासाठी विटा, सिमेंट, रेती, लोखंड व अन्य साहित्य महिला बचत गटामार्फत गावात उपलब्ध करण्यासाठी तसेच लाभार्थ्यांची आर्थिक बचत व्हावी या दृष्टीकोनातून शेंदूरजना बाजार येथे आम्रपाली महिला बचत गटाने पुढाकार घेतला. याकरिता बचत गटाच्या माध्यमातून घरकुलासाठी मटेरियल पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिला बचत गटाच्या या उपक्रमाचा सरपंच प्रतीक्षा कुरळकर, उपसरपंच शिल्पा खांडेकर, सचिव भुयार, दीपाली उमप, रिना वाघमारे, आशा चौधरी, संगीता गजबे, उज्ज्वला ठाकूर, शिल्पा भारती, श्रुतिका, वानखडे, प्रीती भारती, सविता भोजने, लता सोनोने, भावना चौधरी, नीलिमा चौधरी, रेखा कुरजेकर, विशाल सावरकर, दामोधर हरिभाऊ निमकर, अरविंद वेरुळकर, पंकज नीळकंठ चौधरी आदींच्या उपस्थितीत बचट गटातील महिलांनी सदर उपक्रम सुरू केला आहे.