शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

शंकर महाराजांना अटक करा

By admin | Updated: August 29, 2016 23:58 IST

पिंपळखुटा येथील संत शंकर महाराजांच्या आश्रमात गुप्तधनासाठी प्रथमेश सगणे या ११ वर्षीय चिमुरड्याचा नरबळी घेण्याचा प्रयत्न झाला.

अमरावतीत ‘आक्रमण’अमरावती : पिंपळखुटा येथील संत शंकर महाराजांच्या आश्रमात गुप्तधनासाठी प्रथमेश सगणे या ११ वर्षीय चिमुरड्याचा नरबळी घेण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये तिघांना अटक झाली असली तरी मुख्य आरोपी शंकर महाराजांना वगळले गेले आहे. आश्रमाचे संचालक म्हणून या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार शंकर महाराजांना तत्काळ अटक करून त्यांच्या ट्रस्टच्या संपत्तीची चौकशी करावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी आक्रमण युवा संघटनेने विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. पिंपळखुटा येथील आश्रमाचे सर्वेसर्वा शंकर महाराज नागपुरे यांनी स्वत:च्या नावे आश्रम काढून विविध शाळा, महाविद्यालये व वसतिगृह सुरू केलेत. शेकडो एकर जमीनही खरेदी केली. पिंपळखुट्यातच नव्हे, तर राज्यात अनेक ठिकाणी शंकर महाराजांनी मोठे आश्रम थाटले आहेत. शंकर महाराजांनी गुप्तधनासाठीच प्रथमेश सगणे या विद्यार्थ्याचा नरबळी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आक्रमण संघटनेने विभागीय आयुक्तांसह जिल्हा पोलीस अधीक्षक व अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. या भयंकर प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. मात्र, प्रकरणाचे मुख्य सूत्रधार शंकर महाराज यांना अद्यापही अटक झालेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही ‘आक्रमण’च्या पदाधिकाऱ्यांनी केला. शंकर महाराजांजवळ शेकडो एकर जमीन कोठून आली, ही संपत्ती त्यांनी कोठून मिळविली, या प्रश्नांची उकल तातडीने करावी, अशी मागणी आक्रमणद्वारे करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (इर्विन) विशाल अश्वप्रतिमेचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम बंद करून येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या स्मृतिप्रित्यर्थ असलेल्या स्तंभाची विटंबना थांबवावी, मौजे रहाटगाव येथील शेत सर्वे नं १२१ मधील निराश्रित गरजूंना घरे बांधण्याकरिता जागा द्यावी, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करून कायमस्वरूपी आॅटोरिक्षा स्टँड उभारावे, मागासवर्गीयांवर हेतुपुरस्सरपणे अन्याय करणाऱ्यांविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष सुनील गजभिये यांनी केले. यावेळी महिला आघाडीप्रमुख शीतल पाटील, रवी गवई, मिलिंद लोणपांडे, करीम शहा, सिद्धार्थ आठवले, राजू रौराळे, जयंत राऊत, गजानन आठवले, मंगेश वानखडे, विद्या ढोले, रेश्मा तायडे शीला ढोके, सतीश मकेश्र्वर, देवीदास जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)