शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

गौलखेडा बाजार, आडनदी पेपरलेस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:58 IST

आदिवासीबहुल दुर्गम क्षेत्र असलेल्या मेळघाटात मोबाईलची रेंज पूर्णत: पोहोचली नसताना, तालुक्यातील आडनदी व गौलखेडा बाजार या दोन ग्रामपंचायती ‘पेपरलेस’ झाल्या आहेत. आदिवासींना प्रशासनाच्या या कार्यतत्परतेने सर्व व्यवहार आॅनलाईन करता येणार आहे.

ठळक मुद्देव्यवहार आॅनलाईन : अनेक अडचणींवर मात, ग्रामसेवक, सरपंच, सदस्यांचा पुढाकार

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : आदिवासीबहुल दुर्गम क्षेत्र असलेल्या मेळघाटात मोबाईलची रेंज पूर्णत: पोहोचली नसताना, तालुक्यातील आडनदी व गौलखेडा बाजार या दोन ग्रामपंचायती ‘पेपरलेस’ झाल्या आहेत. आदिवासींना प्रशासनाच्या या कार्यतत्परतेने सर्व व्यवहार आॅनलाईन करता येणार आहे.शहरी सोयी-सुविधांच्या कोसोदूर असलेला मेळघाट आता कात टाकू लागला आहे. ज्या गावात मोबाइलची रेंज पोहोचली, तेथे आदिवासींच्या उत्थानासोबत त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविले जात आहे. त्याअनुषंगाने चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत दोन ग्रामपंचायतींचे कामकाज पूर्णत: आॅनलाइन करण्यात आले आहे. तालुक्यातील आडनदी ग्रामपंचायत ५ नोव्हेंबर रोजी, तर ११ डिसेंबर रोजी गौरखेडा बाजार या ग्रामपंचायतीला ‘पेपरलेस ग्रामपंचायत’ घोषित करण्यात आले. चिखलदरा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी मिताली सेठी यांनी मंगळवारी गौरखेडा बाजारचे ग्रामसेवक सुधीर भागवत, सरपंच महल्ले यांना प्रमाणपत्र दिले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती जयंत देशमुख, विस्तार अधिकारी संदीप देशमुख, माजी आमदार केवलराम काळे, जि.प. सदस्य दयाराम काळे, पं.स. सदस्य अखिलेश महल्ले, मुख्याध्यापक देवेंद्र्र ठाकरे, आनंद पडियार उपस्थित होते.पाच ग्रामपंचायती प्रस्तावितडोंगरमाथ्यावर, घाटवळणात, उंच कपाळाच्या कुशीत मेळघाटातील आदिवासी खेडी वसलेली आहेत. दूरसंचार विभागाकडून मोबाइल टॉवर लाइन टाकण्याचे काम सुरू असून, आजही अनेक खेडी मोबाइल रेंजच्या बाहेर आहेत. अशातही आडनदी व गौरखेडा बाजार नंतर टेंब्रुसोंडा, कूलंगणा, काटकुंभ, धरमडोह, आणि मोरगड या पाच ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली. जिल्ह्यात मोर्शी पंचायत समिती अंतर्गत ११ आणि अमरावती पंचायत समिती अंतर्गत दोन ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत. चिखलदरा तालुक्याने दोन ग्रामपंचायतीनंतर पुन्हा पाच ग्रामपंचायती पेपरलेससाठी प्रस्तावित केल्याने केल्याने जिल्ह्यात चिखलदरा पंचायत समितीचे कौतुक होत आहे.कर, देयक सबकुछ संगणकावरशासनाच्या ‘आपले सरकार’ केंद्र अंतर्गत ग्रामपंचायती पेपरलेस होत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या कंत्राटानुसार केंद्रचालक सोयीसुविधा पुरविणार आहेत. ग्रामपंचायती अंतर्गत जन्म-मृत्यू नोंद, ग्रामपंचायतीचे १ ते ३३ नमुने घर टॅक्स, पाणी पट्टी, ग्रामपंचायतीचे विविध कर, वीज देयकांसह ग्रामपंचायतीला प्राप्त होणारा निधीसुद्धा आता आॅनलाइन व्यवहारात आला आहे. याशिवाय आॅनलाइन व्यवहारात काही टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतींना मिळणार आहे.

टॅग्स :onlineऑनलाइन