शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

गॅस कटरने तोडले एटीएम; आठ मिनिटात १६.४५ लाख लंपास

By प्रदीप भाकरे | Updated: May 12, 2023 17:27 IST

Amravati News स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने तोडून तब्बल १६ लाख ४५ हजार ५०० रुपये लंपास करण्यात आले.

अमरावती: स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने तोडून तब्बल १६ लाख ४५ हजार ५०० रुपये लंपास करण्यात आले. चोरांचे एटीएममध्ये येणे व कटरने कापून रोख लांबविणे, हा सर्व प्रकार केवळ आठ मिनिटांमधील आहे. त्यामुळे ते चोरटे ‘वेल ट्रेन्ड’ आणि शार्प असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गुरूवारी पहाटे २.५५ ते ३.०३ या कालावधीत ही धाडसी चोरी झाली. चोरीचा संपुर्ण घटनाक्रम सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

             याप्रकरणी एटीएम कंपनीचे चॅनेल मॅनेजर पवन भोकरे यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी १२ मे रोजी सकाळी १०.१२ च्या सुमारास अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला. माहिती मिळताच वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अमरावतीहून जरूडला पोहोचले. श्वानपथक व ठसेतज्ञांना देखील पाचारण करण्यात आले. दरम्यान, एटीएमच्या ज्या सीसीटिव्हीमध्ये संपुर्ण घटनाक्रम कैद झाला, ते संपुर्ण फुटेज जप्त करण्यात आले आहे. सायबर शाखेची मदत घेऊन चोरांचे चेहरे उघड करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. चोर ज्या चारचाकीने आले, त्याच चारचाकीत ते ५०० व १०० रुपयांची रोकड असलेला स्ट्रे लांबविताना दिसत आहे.

असा आहे घटनाक्रमगुरुवारी रात्री लाल रंगाच्या चारचाकी वाहनाने चोर जरूडच्या एसबीआयच्या एटीएमपर्यंत आले. त्या गाडीचा क्रमांक टीओ ४२३ एचपी २५२० असा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. १२ मे रोजी पहाटे २.५६ मिनिटांनी एक आरोपी एटीएममध्ये स्प्रे मारताना दिसतो. तर, २.५७ ला दुसरा चोर आत येतो. त्याचवेळी एटीएममधील सायरन वाचतो. त्यामुळे एकाची धांदल उडते. त्यामुळे स्प्रे मारणारा एटीएमच्या बाहेर जाऊन दारात बसतो. शटर अर्धे खाली आणतो. त्यानंतर काही सेकंदात एटीएम गॅस कटरने तोडली जाते. त्याचा आवाज व आगीच्या चिंगाऱ्या स्पष्ट दिसतात. त्यानंतर आरोपी त्यातील संपुर्ण रक्कम घेऊन पसार होतात.

पोलीस अधीक्षकांची भेट

हे चोरटे अत्यंत प्रशिक्षित आणि सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी एटीएमची आधी रेकी केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, सीआयडी आयकार्ड युनिट, एलसीबीचे निरिक्षक तपन कोल्हे, अक्षय रेवडकर, राजेन्द गुहे आदींनी भेट दिली. वरूड पोलिसांसह एलसीबी तपास करीत आहेत. 

आंतर राज्यीय टोळी असल्याचा संशयते गुन्हेगार अत्यंत सराईत असल्याने आणि सोबतच गाडीच्या डिक्कीत गॅस कटर आणि सिलेंडर घेवून अवघ्या आठ मिनिटात १६ लाख रुपये लंपास करून पसार झाल्याने ती टोळी आंतरराज्यीय असावी, समोर एखादा कंटेनर उभा करून घटनेत वापरलेले चारचाकी वाहन कंटेनरमध्ये लपवून पसार झाले असावेत, असा कयास बांधला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी