शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कचराभूमीतील आग कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:10 IST

सुकळी येथील कचरा भूमीत लागलेली आग महिना उलटत आला तरी कायमच आहे. तेथील कचऱ्याचे २१ दिवसांत कंपोस्ट खत तयार करण्याच्या वल्गना करणारे महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सामान्यजनांच्या डोळ्यांत आणखी किती धुळफेक करावी, असा सवाल आता त्रस्त नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारू लागले आहेत.

ठळक मुद्देआयुक्तांकरवी दिशाभूल : काय झाले कंपोस्ट खताचे?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुकळी येथील कचरा भूमीत लागलेली आग महिना उलटत आला तरी कायमच आहे. तेथील कचऱ्याचे २१ दिवसांत कंपोस्ट खत तयार करण्याच्या वल्गना करणारे महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सामान्यजनांच्या डोळ्यांत आणखी किती धुळफेक करावी, असा सवाल आता त्रस्त नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारू लागले आहेत.अत्यंत घातक प्रदूषण निर्माण करणारी ही आग तत्काळ प्रभावाने नियंत्रित करण्यासाठी प्रभावी पावले उचलणे हे महापालिकेचे कर्तव्य होते. परंतु कारवाई केल्याचा देखावा करणारे महापालिका आयुक्त लोकारोग्याबाबत गंभीर नाहीत, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे. यापूर्वीही महापालिका आयुक्तांनी केवळ 'कागदोपत्री' पाऊले उचलून हजारो लोकांना डेंग्युच्या विळख्यात जखडू दिले. अनेकांना त्यामुळे प्राणासही मुकावे लागले. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, पालकंमंत्री प्रवीण पोटे यांनी या मुद्याची दखल घेऊन चौकशीचे आदेश देखील दिले होते. तरीही डेंग्युचा डंख नागरिकांना होत राहिला. पर्यावरण राखण्याच्या मुद्यासंबंधी केंद्र शासनाच्या कठोर कायद्यांना आयुक्त हुलकावणी देत असल्यामुळे सुकळीतील 'गॅस चेंबर'ही नागरिकांचे बळी घेणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAmravatiअमरावती