अमरावती : महाशिवरात्रीच्या पर्वावर शहरातील शिवालयांमध्ये शिवभक्तांचा जनसागर उसळला. हर हर महादेवांच्या जयघोषाने शिवालये दुमदुमून गेली. शिवभक्तांनी विविध कार्यक्रमातून आराधना केली. महादेवाचे गुणगान करीत पहाटेपासूनच शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. मंगळवारी जिल्ह्याभरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शहरातील महादेवाची देवालये सोमवारी मध्यरात्रीपासूनच सजायला लागली होती. पहाटे ५ वाजता पासून विविध शिवालयामध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. हर,हर, महादेव व जय भोले शंकराचे गुणगाण गात हजारो भाविक महादेवाची आराधनेत मग्न झाले होते. महादेवासाठी विविध प्रकारचे फुल, बेल पाने व दुग्धजन्य पदार्थ वाहत शिवभक्तांनी महाशिवरात्री साजरी केली. शहरातील गडगडेश्वर, महादेव खोरी, रवीनगर, सकंट मोचन, विश्वेश्वर मंदिर, मोर्शीतील सालबर्डी आदी विविध शिवालयामध्ये शिवभक्तांचा जनसागर उसळला होता. गडगडेश्वर मंदिरात दुग्धाभिषेकस्थानिक हिन्दू स्मशान भुमीच्या मागील परिसरात गडगडेश्वर मंदिर आहे. दरवर्षी मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही शिवभक्तांनी पहाट प्रथम महादेवाचा दुग्धाभिषेक केला. शिवभक्तांसाठी प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाकडून प्रदर्शनी लावण्यात आली होती. ज्यामध्ये १२ ज्योतिर्लिंगांची माहिती देण्यात आली. महादेव खोरीत धार्मिक कार्यक्रमसंकट मोचन मंदिरात रोषणाईदसरा मैदान स्थित संकटमोचन मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी जमली होती. मंदिर व्यवस्थापनाकडून मंदिराभोवती रोषणाई करण्यात आल्याने महादेवाचे आकर्षक रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.विश्वेश्वर मंदिरात दर्शनार्र्थींसाठी विशेष व्यवस्थारविनगर परिसरातील विश्वेश्वर मंदिरात सकाळपासूनच भक्तांची रीघ लागली होती. शिवाच्या गाभाऱ्यात जावून दर्शन घेण्यासाठी दुरदुरवरुन शिवभक्त आले होते. मंदिर व्यवस्थापनाकडून शिवभक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. नवाथे नगरात मोफत बससेवाशिवभक्तांना तपोवनेश्वरच्या शिवालयात पोहोचविण्याकरीता नवाथे नगरात मोफत बससेवा सुरु करण्यात आली. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही बससेवा देण्यात आल्याने भाविकांनी शिवदर्शनाचा लाभ घेतला.
‘हर हर महादेव’च्या गजराने गुंजली शिवालये
By admin | Updated: February 18, 2015 00:07 IST