शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

गांगरखेड्याचा ‘बैलबाजार’ युवकांनी उधळला

By admin | Updated: July 26, 2016 00:26 IST

तालुक्यांतर्गत येणाऱ्या गांगरखेडा येथे आठवड्याच्या सोमवारी भरणारा बैलबाजार परिसरातील शेकडो युवकांनी उधळून लावला.

रोष : पोलीस अधीक्षकांना निवेदन, व्यापाऱ्यांचा पोबाराचिखलदरा : तालुक्यांतर्गत येणाऱ्या गांगरखेडा येथे आठवड्याच्या सोमवारी भरणारा बैलबाजार परिसरातील शेकडो युवकांनी उधळून लावला. १२.३० वाजता काटकुंभ पोलीस चौकीत जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देऊन बाजाराविषयी रोष व्यक्त करण्यात आला.गांगरखेडा येथे सोमवारी भरणाऱ्या बैलबाजारात मध्यप्रदेशातील सर्वाधिक गुरे येत होती. या गाय, बैलांची खरेदी करण्यासाठी चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव, करजगाव, अकोट आदी परिसरातील व्यापारी येत होते. अवैध कत्तलखाण्यासाठी खरेदी केल्या जात होती. या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये वर्षभरापासून संताप होता. चांदूरबाजार येथील खरवाडीच्या घटनेनंतर गांगरखेडा येथील बैलबाजार प्रकर्षाने सर्वांचे लक्ष केंद्रीत करणारा ठरला होता. येथील गुरे विक्रीमुळे नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. सोमवारी काटकुंभ चौकीत निवेदनकर्त्यांमध्ये पीयूष मालवीय, संजू राठौर, नीलेश येवले, गजेंद्र येवले, गणेश बडवे, आलोक अलोकार, बबलू राठौर, रूपेश भक्ते, दीपक गोरले, शिवदास आठोले, प्रशांत उईके, प्रमोद धुर्वे, सचिन धुर्वे, नरेंद्र उईके आदींचा समावेश होता. बाजार उधळून लावलागावागावांत युवकांनी गौवंश हत्याविरुद्ध बैठका घेतल्या होत्या. आज सोमवारी गांगरखेडा येथे सकाळी ११ वाजता परिसरातील शेकडो युवक मोटरसायकली घेऊन एकत्र झाले होते. तेथे काही पशुपालकांनी आपली गुरे विक्रीला आणली. त्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच व्यापाऱ्यांना रात्रीच सदर प्रकाराची कुणकुण लागल्याने पहाटे पाच वाजताच त्यांनी परिसरातून पोबारा केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.‘लोकमत’चा दणका‘लोकमत’ने २३ जुलैच्या अंकात सर्वप्रथम गांगरखेडा येथील बैलबाजाराविरुद्ध वृत्त प्रकाशित केले होते. त्याच दिवसापासून परिसरातील नागरिकांनी बंदीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. ‘लोकमत’च्या वृत्ताचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.