शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Ganesh Chaturthi 2018; गणरायाच्या स्वागतासाठी अंबानगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:30 IST

‘गणपती बाप्पा मोरया..’चा एकच घोष ऐकू येण्यास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. जिल्हाभरात सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी गणरायाच्या आगमनाच्या तयारीला वेग आला आहे.

ठळक मुद्देबाजारपेठ फुलली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘गणपती बाप्पा मोरया..’चा एकच घोष ऐकू येण्यास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. जिल्हाभरात सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी गणरायाच्या आगमनाच्या तयारीला वेग आला आहे. यानिमित्त बाजारपेठ गणेशोत्सवासाठी सजावटीच्या विविध साहित्यांनी सजली आहे.शहरातील गोपालनगर, फ्रेजरपुरा, राजापेठ, अंबागेट, नेहरू मैदान, शेगाव नाका, बडनेरा आदी ठिकाणाहून भव्य गणेशमूर्ती मंडळांकडून नेल्या जाणार आहेत. त्यासाठी वाहन, ढोल-ताशे, पारंपरिक भजनी पथक, गायक-वादक मंडळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव अंतिम टप्प्यात आहे. हा सण कॅश करण्यासाठी सजावटीच्या साहित्यासह गुलाल, पूजा साहित्य मोठ्या प्रमाणात अमरावतीत दाखल झाले आहे. हैद्राबाद निर्मित गुलाल आणल्याची माहिती आहे.गणराया म्हणजे चैतन्याचे मूर्तिमंत प्रतीक. त्याचेच आगमन होणार असल्याने सर्वत्र उत्साह, चैतन्याचा संचार दृष्टीस पडत आहे. आझाद मंडळ, निळकंठ मंडळ, बजरंग मंडळ, न्यू आझाद मंडळ, विद्यार्थी गणेश मंडळ, श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळासह इतर गणेश मंडळांच्या गणरायाच्या आगमनानिमित्त निघणाऱ्या रॅलीचेही आकर्षण शहरवासीयांना लागले आहे. काही मंडळांचे देखावे बिगबजेट आहेत. राज्यासह देशातील मंदिरे, किल्ले, राजदरबार, हवेली आदी प्रमुख स्थळांचे मनोहारी दर्शन यावेळी होईल.जिल्ह्यात तीन हजारांवर सार्वजनिक मंडळे आहेत. ग्रामीणमध्ये २४४०, तर शहरात ५४९ गणेशमूर्तींची स्थापना केली जाणार आहे. घरोघरीही गणरायाची स्थापना होईल. चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

रोषणाई : सीरीज, एलईडीगणेशोत्सवानिमित्त सजावटीसोबतच रोषणाईसाठी बाजारपेठेत यंदा पारंपरिक सीरीज व एलईडी विक्रीस आहेत. यात सीरीज, लॅम्प, कंदील, झुंबराकरिता आकर्षक रंगसंगतीचा वापर केला आहे. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार हे साहित्य खरेदी करीत असल्याचे विक्रेते महेश आहुजा यांनी सांगितले.मोत्याच्या माळा, झेंडू हारलाडक्या गणरायाच्या सजावटीसाठी मोत्याच्या माळा, मोती हार, हार्डबोर्ड, गुलाब हार, झेंडू हार, गणपती छत्री, कपडे, तोरणे, पडदे, झालर, टोपी, आदी सजावटीचे साहित्य मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली येथून शहरात दाखल झाले. ९० रुपये डझन व नगाने ५०० पर्यंत किंमत असल्याचे विक्रेते रोशनभाई यांनी सांगितले.

ड्रायफ्रूट मोदकलाडक्या बाप्पांना अर्पण करण्यासाठी ड्रायफ्रूट्स मोदकासह वेगवेगळ्या प्रकारचे मोदक विक्रीस उपलब्ध झाले आहेत. मिठाईची दुकानेही सजली आहेत. मिठाई तयार करण्यासाठी गुजरातेतून खवा आणला जात आहे. यंदा ड्रायफ्रूट मोदक, मलाई मोदक, केसर मोदक, खोबरा मोदक आदी प्रकार पाहावयास मिळतील. त्यांचे दर २८० रूपयांपासून तर ४०० रुपये किलोपर्यंत आहेत. ग्राहकांची पहिली पसंती या मिठाईला असल्याचे विक्रेते प्रदीप धोराजीवाला यांनी सांगितले.

देखणे मखर यंदाचे खास आकर्षणयावर्षी गणेशोत्सव सजावटीचा खास आकर्षण म्हणजे मखर आहे. इको-फ्रेंडली मखराने सजावटीचे काम सोपे केले आहे. यामध्ये रंगरंगोटी, लाइटिंग वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे विक्रेते अशोक पिंजाणी म्हणाले.

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८