शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावर धाड, आठ दुचाकी व चार लाखांच्या मुद्देमालासह तीन जण अटकेत

By प्रदीप भाकरे | Updated: November 8, 2022 14:55 IST

आठ जण फरार

अमरावती : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चांदूरबाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख येथील जुगार अड्ङा उध्वस्त केला. तेथून तीन जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. तर आठ जण फरार झाले. तेथून आठ दुचाकींसह एकूण चार लाखांचा मुद्देमला जप्त करण्यात आला.

एलसीबीनुसार, गफ्फार बेग ऊर्फ गब्बर मेहमुद बेग (४२), पवन ऊर्फ टाबु रमेश धिवधोंडे (२७) व निलेश गोवींदराव भुयारकर (३८, सर्व रा. कुऱ्हा देशमुख) अशी अटक आरोपींची नावे आहेत. फरार आरोपी देखील कुऱ्हा देशमुख येथील रहिवासी आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोमवारी शिरजगाव कसबा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, काही आरोपी हे कुऱ्हा देशमुख येथील भवानी पांदन रस्त्याने एका शेतात झाडाखाली एक्का- बादशहा नावाचा जुगार खेळत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यावरून धाड घातली असता, आरोपीच्या ताब्यातून आठ दुचाकी, रोख रक्कम, व जुगाराचे साहित्य असे मिळून एकूण ३ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींना पुढील कार्यवाहीकरीता शिरजगाव कसबा ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी अतुलकुमार नवगिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत गिते, उपनिरिक्षक मुलचंद भांबुरकर व अमोल मानतकर, युवराज मानमोठे, मंगेश लकडे, स्वप्नील तंवर, अमोल कपले, भुमेश्वर तायडे, संदीप नेहारे यांनी ही कारवाई केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीSatta Bazarसट्टा बाजार