----------------------------------------------------
खासगी नेटवर्कचे केबल लंपास
अमरावती : अज्ञात आरोपीने २५ हजार रुपये किमतीचे यूसीएससी केबल तसेच फायबर ऑप्टिक केबल चोरून नेल्याची घटना २८ जून रोजी राजकमल चौकातील रोहित दूध डेअरीनजीक खासगी केबल नेटवर्कच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध ७ जुलै रोजी गुन्हा नोंदविला. नितीन शामप्रसाद मिश्रा (४१, रा. नमुना गल्ली) यांनी तक्रार दिली.
--------------------------------------------------
दुचाकीचोराला पकडले
अमरावती : दुचाकीचोरीच्या उद्देशाने घराच्या आवारात शिरलेल्या दुचाकीचोराला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही घटना भारतीय कॉलनी येथे ७ जुलै रोजी घडली. राजेश ऊर्फ अजय गोवर्धन दांडगे (२९, रा. तळणी, ता. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी किरण महादेवराव गुल्हाने (५९, रा. भारतीय कॉलनी) यांनी तक्रार नोंदविली.