शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

गाळपेरच्या निर्णयात गोरक्षण संस्थांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:50 IST

 एक रूपयात भाडेपट्टीने जमीन : विभागीय आयुक्तांद्वारा कृषी विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र

अमरावती : राज्यातील १५१ तालुक्यांसह २६८ महसूल मंडळामध्ये शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली. यावर तातडीची उपाययोजना म्हणून जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील तलाव व जलाशयाची जमीन वैरण पिके घेण्याचा निर्णय शासनाने ३१ आॅक्टोबरला घेतला. एक रूपया नाममात्र भाडेपट्टीने ही जमीन मिळणार आहे. मात्र, गोरक्षण संस्थांचा उल्लेख शासन निर्णयात नसल्याने विभागीय आयुक्तांनी कृषी विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र दिले आहे.

 राज्यातल्या दुष्काळी भागात उपाययोजना सुरू करण्यात आल्यात. या सर्व गावांत पाणीटंचाईसह वैरणटंचाईची मोठ्या प्रमाणावर समस्या असल्याने यासर्व ठिकाणी चाºयाचे नियोजन करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गावातच चारा उपलब्धत व्हावा, यासाठी नियोजन सुरू आहे. यात गाळपेर क्षेत्रात चारा निर्मिती हा पर्याय म्हणून समोर आला आहे. प्रकल्पाला कोरड पडल्याने यातील पाणीसाठा कमी झालेला आहे. या बुडीत क्षेत्रातील जमिनी शेतकºयांना मका, ज्वारी, बाजरी सारखी चारा पिके घ्यायला नाममात्र एक रूपया भाडेपट्टीने शेतकºयांना देण्यात येणार आहे. यामध्ये विविध योजनांमधून शेतकºयांना मोफत बियाणे देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्य समिती राहणार आहे. यामध्ये जिल्हा पशुसंवर्र्धन उपायुक्त सदस्य सचिव राहणार आहेत.

 जलाशयातील पाणी विनामुल्य चाराटंचाईचा सामना करण्यास वैरण पिकांसाठी प्रकल्पाचे पानी हे विनामुक्य मिळणार आहे. मात्र, हा चारा शेतकºयांना स्वताच्या पशुधनासाठी उपयोगात आणावा लागणार आहे.  अतिरिक्त चारा हा लगतच्याच शेतकºयांना उपलब्ध करावा लागेल. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन हजार हेक्टर गाळपेर क्षेत्रावर  चारा पिकांची लागवड करण्याचे बंधन आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी याबाबतचे निर्देश जारी केलेले आहेत.

 यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांनी वेधले लक्षज्या शेतकºयांच्या जमिनीचे प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आलेले आहे. स्थानिक भूमिहीन, स्थानिक भूमिहीन नागरिकांच्या सहकारी संस्था, अन्य जमातीचे स्थानिक भूमिहीन नागरिक, बाहेरील भुमिहीन नागरिक, स्थानिक भूधारक, यापैकी लाभार्थी उपलब्ध न झाल्यास ज्यांच्या जवळ जास्त पशुधन आहेत अश्या शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, या शासन निर्णयात गोरक्षण संस्थाचा उल्लेख नसल्याची बाब यवतमाळचे जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांचे निदर्शनात आणली आहे.