शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘गालफुगी’ आजाराचे रु ग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:12 IST

‘गालगुंड’ किंवा ‘गालफुगी’ हा सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये पॅरामिक्झोव्हायरस या विषाणुमुळे होणारा आजार आहे. तसेच मुलांमध्ये लाळ ग्रंथींना होणारा विषाणुजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालांना येणारी दुखरी सूज हे त्याचे प्राथमिक लक्षणे आहे.

ठळक मुद्देलसीकरण महत्त्वाचे : तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘गालगुंड’ किंवा ‘गालफुगी’ हा सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये पॅरामिक्झोव्हायरस या विषाणुमुळे होणारा आजार आहे. तसेच मुलांमध्ये लाळ ग्रंथींना होणारा विषाणुजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालांना येणारी दुखरी सूज हे त्याचे प्राथमिक लक्षणे आहे. ग्रामीण भागामध्ये या आजाराचे काही रुग्ण आढळून आले असून यासंदर्भात योग्य काळजी घेऊन उपचार व होऊ नये, याकरिता लसीकरण करणे महत्त्वाचे असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ धीरज सवाई यांनी सांगितले.गेल्या आठवड्यापूर्वी काही ‘गालफुगी’चे रुग्ण जिल्ह्याील ग्रामीण भागामध्ये आढळून आले आहेत. उपचारानंतर ते बरे झाले. या आजाराला पॅरोटायटीस असेही म्हणतात. गालामधील लाळग्रंथींना पॅरोटिड ग्लँड असेही म्हणतात. त्याचे ‘मम्स’ हे नावसुध्दा आहे.या आजाराची योग्यरीत्या वेळीत दखल न घेतल्यास गंभीर परिणामही होऊ शकतात. आजाराचा रुग्ण प्रामुख्याने पावसाळ्यानंतर आढळून येतात. या आजाराचे जुलैनंतर सिझन सुरु होते, तर हिवाळ्यातसुद्धा याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सर्दी, खोकला जर मुलांना असेल तर याचे विषाणु हवेतून इतरांच्या शरीरात जावून त्यांनाही या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. हा झपाट्याने संसर्ग होणार हा आजार असून शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. सूज येणे, गाल लाल होणे आदी लक्षणे या आजाराची आहेत. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे.गालफुगी आजाराची ही आहेत लक्षणेव्हायरल इन्फेक्शनमुळे लहान मुलांमध्ये होणारा आजार आहे. यामध्ये एका बाजुने गालफुगी होते नंतर दुसºया बाजुने गालफुगी होेते. या आजारात मुलांना ताप येतो. पोटाचेसुद्धा विकारसुध्दा बळावतात. उलट्या होतात. त्वरित उपचार केला नाही, तर मेंदूवर सूज येण्याची शक्यता असते. ५ ते १२ वयगटातील मुलांमध्ये हा आजार होेत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. हा आजार शाळेत एकाला झाल्याच त्यापासून अन्य विद्यार्थ्यांनाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.काय केले पाहिजे?हा आजार घशाच्या संबंधित असल्याने, जास्त पाणी पिणे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, एमएचआर अंतर्गत मुलांचे गालफुगी(मम्स) या आजाराचे लसीकरण करणे, यामध्ये पहिली लस बाळ १५ महिन्याचे असताना तर दुसरी लस साडेतीन वर्षांचे झाल्यानंतर करणे अनिवार्य राहते.ताप मेंदूत जातो. हृदयावरसुध्दा याचा परिणाम होऊ शकतो. याचा त्वरित उपचार केला नाही तर मुलांना जीवनात वंधत्वसुद्धा येऊ शकतो. त्या कारणाने या आजाराला दुर्लक्षित करु नये.- धीरज सवाई, बालरोगतज्ज्ञ