शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

चार इमारतींवर चालणार गजराज

By admin | Updated: May 2, 2015 00:16 IST

अतिरिक्त आणि नियमबाह्य बांधकाम करुन महापालिका प्रशासनाचे लाखो रुपयांचे शुल्क बुडविणाऱ्या शहरातील चार इमारतींवर गजराज चालणार आहे.

कोर्टात ‘कॅव्हेट’ दाखल : आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशअमरावती : अतिरिक्त आणि नियमबाह्य बांधकाम करुन महापालिका प्रशासनाचे लाखो रुपयांचे शुल्क बुडविणाऱ्या शहरातील चार इमारतींवर गजराज चालणार आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार या इमारत मालकांना अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. दहा दिवसांत हे अतिरिक्त बांधकाम जमीनदोस्त केले जाणार असून प्रशासनाने कोर्टात कॅव्हेटसुद्धा दाखल करुन घेतला आहे.कल्याणनगर येथील अश्विन बी. राऊळकर, पंकज मारोतराव बागडे, मुदलियारनगर येथील संतोष बाबूलाल मालवीय तर ‘एम्पायर हाईट’ यांना नियमबाह्य अतिरिक्त बांधकामाप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निर्देशानुसार येथील जिल्हा सत्र न्यायालयात या नियमबाह्य बांधकाम प्रकरणी ‘कॅवेट’ दाखल करण्यात आला आहे. शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 'कॅवेट' दाखल करुन प्रशासन भूमिका स्पष्ट करण्याची कार्यवाही करणार आहे. काही वर्षांपासून अतिरिक्त बांधकाम अथवा अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना यासंदर्भात कारवाई करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नव्हते. मात्र, आयुक्त गुडेवार यांना प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रायोगिक तत्त्वावर चार इमारतींचे अतिरिक्त आणि नियमबाह्य बांधकाम पाडण्याचे ठरविले आहे. या चारही इमारतींचे नियमबाह्य बांधकाम पाडून शहरात अवैध बांधकाम, अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात करण्याचा निर्धार आयुक्तांनी केला आहे. यापूर्वी अतिक्रमण अथवा नियमाबह्य बांधकाम हटविण्याची कारवाई प्रशासनाने सुरु केली की, पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेपाने ती टळत असे. परंतु आयुक्त गुडेवार यांनी सूत्रे स्वीकारताच कामकाजात पारदर्शकता आणण्याकरिता कोणतीही नियमबाह्य कामे होणार नाहीत, असे ठरविल्याने त्यांच्या निर्णयात कोणताही पदाधिकारी हस्तक्षेप करीत नसल्याचे चित्र आहे.शहरात अवैध बांधकाम पाडण्याला विरोध नाही. मात्र, याबाबतची माहिती प्रशासनाने द्यायला हवी. महापालिका आयुक्त सुटीवर जाण्यापूर्वी कळवितात, तशी काही कारवाई केली जात असेल तर त्यांना त्याबाबत अवगत करणे गरजेचे आहे.- चरणजितकौर नंदा,महापौर, अमरावती.अनधिकृत बांधकामप्रकरणी चार मालमत्ताधारकांना नोटीस बजावून १० दिवसांचा अवधी दिला आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास बांधकाम पाडले जाईल. बांधकाम नियमानुसार करण्यासाठी दंडात्मक रक्कम वसूल केली जाईल.- चंद्रकांत गुडेवार,आयुक्त, महापालिका.नागरिकांनी नियमाप्रमाणे बांधकाम करावे. शहरातील काही संकुलांमधून पार्किंग गडप झाले आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न उद्भवतो. अवैध बांधकामावर नियमाने कारवाई करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.- सुनील देशमुख,आमदार, अमरावती.कोणतीही कारवाई करताना चौकशी व्हावी. आकसाच्या भावनेतून कारवाई होऊ नये. गरिबांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता आयुक्तांनी घ्यावी. तक्रार योग्य की, अयोग्य हे तपासून घ्यावे. आतताईपणाने निर्णय घेऊ नये.- रवी राणा,आमदार, बडनेरा.