शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात चालला गजराज

By admin | Updated: February 17, 2016 00:00 IST

महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी बडनेरातील अतिक्रमण हटविले.

अतिक्रमण निर्मूलन : आठवडी बाजार, मोतीनगरात मोहीमश्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरामहापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी बडनेरातील अतिक्रमण हटविले. नवीवस्तीतील आठवडी बाजार, सोमवार बाजार तसेच जुन्यावस्तीतील मोतीनगरच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ही कारवाई निरंतर सुरुच राहिल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.महापालिका आयुक्त चंद्रकात गुडेवार यांच्या आदेशानुसार बडनेरा शहरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. गत काही महिन्यापासून बडनेरा शहरातील सोमवार बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रणम वाढीस लागले असताना ते रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. आठवडी बाजारात प्रत्येक सोमवारी बाजार भरतो. मात्र, हा परिसर अतिक्रमणाने वेढल्यामुळे दुकानदारांना बाजाराच्या जागेऐवजी रस्त्यांवर दुकाने थाटावी लागतात. यापूर्वी महापालिकेच्या आमसभेत आठवडी बाजारातील अतिक्रमणावर खल झाला होता.सोमवार बाजारात काही विशिष्ट समाजाने जागा बळकावली असताना प्रशासन कारवाई का करीत नाही? असा सवाल सामान्य नागरिकांनी केला आहे. बडनेरा अतिक्रमणाच्या विळख्यातबडनेरा : सोमवार बाजारात अतिक्रमण वाढल्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. भाजीपाला, धान्य खरेदीसाठी येणाऱ्या महिला, युवतींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बाजारासाठी जागा राखीव असताना महापालिका प्रशासनाने ती दुसऱ्या व्यवसायासाठी दिल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमिवर मंगळवारी मुख्य बाजार ओळीत रस्त्यालगतच्या हातगाड्या, पानटपरी, खोके, स्टॉल देखील जप्त करण्यात आले आहेत. आठवडी बाजारात काही महाभागांनी चक्क पक्के बांधकाम करण्याचा प्रताप केल्याचे अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या निदर्शनास आले. मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे टिनाचे शेडस्, खोके आदी साहित्य ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. बडनेरा शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सलग तीन दिवस ही कारवाई केली जाईल, असे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक उमेश सवाई, अभियंता नितीन बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक खराटे यांच्यासह पोलीस कर्मचारी, महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. बडनेरा शहरात अतिक्रमणाची समस्या गंभीर आहे. रस्त्यालगत हातगाड्या, वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक समस्यांचा सामना बडनेरावासियांना करावा लागतो. मुख्य मार्गावरील अतिक्रमण ही समस्या मोठी असून ती दूर करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.