शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गजभियेने दिली हत्येची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:05 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : शीतल पाटील हिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून तिला विहिरीत फेकल्याची कबुली अखेर सुनील गजभियेने पोलिसांना दिली. बुधवारी न्यायालयाने सुनील गजभियेला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे. गाडगेनगर पोलिसांनी गजभियेने गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉडसुद्धा बुधवारी जप्त केला आहे.आक्रमण संघटनेत सक्रिय व सामाजिक क्षेत्रात महिलांच्या उद्घारासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ...

ठळक मुद्देलोखंडी रॉड जप्त : ३१ पर्यंत पोलीस कोठडीत वाढ

आॅनलाईन लोकमतअमरावती : शीतल पाटील हिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून तिला विहिरीत फेकल्याची कबुली अखेर सुनील गजभियेने पोलिसांना दिली. बुधवारी न्यायालयाने सुनील गजभियेला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे. गाडगेनगर पोलिसांनी गजभियेने गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉडसुद्धा बुधवारी जप्त केला आहे.आक्रमण संघटनेत सक्रिय व सामाजिक क्षेत्रात महिलांच्या उद्घारासाठी प्रयत्नशील असणाऱ्या शीतल पाटीलचा खून उघड झाल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली. आक्रमण संघटनेचा प्रमुख सुनील गजभियेनेच त्याच्या सहकार्याने शीतल पाटीलची हत्या केल्याचे रहमानच्या बयाणावरून स्पष्ट झाले. गजभिये पोलिसांची दिशाभूल करीत शीतलने आत्महत्या केल्याचा आव आणत होता. मात्र, पोलीस कोठडीत पोलिसी खाक्याचा हिसका बसताच गजभियेने तिच्या हत्येची कबुली दिली.सुनील श्यामराव गजभिये (रा. रविनगर) व शिवदास गोंडाणे (गडचिरोली) या दोघांनाही बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासकार्यासाठी गाडगेनगर पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर गजभियेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे, तर गोंडाणेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.रहाटगाव रिंगरोडलगत फेकला होता रॉडसुनील गजभिये, शीतल व रहमान कारने चांदूरबाजारहून अमरावतीला येत होते. यादरम्यान सुनील गजभियेने शीतलच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून हत्या केली आणि त्यानंतर रहाटगाव रिंगरोडवर तो रॉड फेकून दिला. शीतलचा मृतदेह एक्स्प्रेस हायवेवरील जुन्या टोल नाक्याजवळील विहिरीत त्यांनी फेकला. त्यानंतर सुनील व रहमान हे दोघेही आपआपल्या घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांनी एक्स्प्रेस हायवेवरील जंगल भागात लोखंडी रॉड फेकून दिला. तो रॉड पोलिसांनी बुधवारी जप्त केला.मोबाईलचा थांगपत्ता नाहीशीतल पाटीलला मोबाईल आरोपींनी विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली. गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू केला. मात्र, विहिरीत पाणी अधिक असल्यामुळे तळ गाठणे शक्य नसल्याचे दिसून आले. शीतल पाटीलचा मोबाइल बाहेर काढण्याचे आव्हान पोलिसासमोर आहे.शीतल पाटील हत्याकांडात वापरलेला लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुनील गजभियेच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ मिळाली असून, शिवदास गोंडाणेची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.- मनीष ठाकरेपोलीस निरीक्षकगाडगेनगर ठाणे.