शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

शेतकऱ्यांना नाडवणारे महाठक गजाआड

By admin | Updated: November 5, 2016 00:08 IST

शासकीय योजनांमधून शेतकी साहित्य देण्याची बतावणी करून शेतकऱ्यांना ठकविणाऱ्या दोन महाठकांना गुन्हे शाखेने गजाआड केले आहे.

बतावणी : परजिल्ह्यातही नेटवर्कअमरावती : शासकीय योजनांमधून शेतकी साहित्य देण्याची बतावणी करून शेतकऱ्यांना ठकविणाऱ्या दोन महाठकांना गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. किशोर हरिचंद्र भुगूल (३८, सावनेर) आणि राजेश गंगाधर बंड (४५, खरवाडी) यांचा अटक केलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे. गतवर्षी जिल्हा परिषद कार्यालयामधून चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास करताना हे दोन महाठक गुन्हे शाखेच्या रडारवर आलेत. चोरीच्या दुचाकींचा वापर करून त्यांनी पंचायत समितीचे अधिकारी असल्याची बतावणी केली व अमरावती जिल्ह्यासह वर्धा, वाशिम, यवतमाळ, अकोला, नागपूर, भंडारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन ते चार लाख रुपयांनी नाडवले. साईनगर येथील संजय धोटे यांची एम.एच. २७ ए.के. ४५३२ ही दुचाकी जिल्हा परिषद आवारातून सन २०१५मध्ये चोरीला गेली.चोरीच्या तपासाने दिली दिशाअमरावती : त्या चोरीचा तपास करत असताना ते वाहन सावनेर येथील एका इसमाकडे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेने सावनेर गाठले. त्याला दुचाकीबाबत व अन्य फसवणुकीबाबत विचारणा केली असता, त्याने राजेश बंड नामक अन्य एका सहकाऱ्याची माहिती दिली. दोघांनी मिळूनच दीड वर्षांपूर्वी ही दुचाकी चोरी केली. त्यानंतर ग्रामीण भागातून एक मोबाईल लंपास केला. सात ते आठ महिन्यांपासून कामुंजा, पुसदा, शिराळा, वलगाव, पूर्णानगर, माहुली जहांगिर, मंगरुळ, धानोरा, माना, कुरूम, कुऱ्हा, दर्यापूर येथील गरीब व गरजू शेतकऱ्यांना त्यांनी पंचायत समिती अधिकारी आणि कर्मचारी असल्याची बतावणी केली तथा पंचायत समितीच्या ज्या योजनांमधून स्प्रिंक्लर संचाकरिता १२ हजार ३०० रुपये, टीनपत्रे व ताडपत्रीकरिता १८०० रुपये आणि शिलाई मशीनसाठी ९३० रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. मागील दीड वर्षापासून त्यांनी वर्धा, वाशीम, यवतमाळ, अकोला, नागपूर, भंडारा जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील ५० ते ६० शेतकऱ्यांची तीन ते चार लाख रुपयांनी फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व मोबाइलचा पोलिसांना पत्ता लागू नये म्हणून दोन्ही आरोपींनी दुचाकी व मोबाइल अंजनगाव ते मार्डी रस्त्यावर बेवारस स्थितीत सोडून दिले. ते ठिकाणसुद्धा आरोपींनी पोलिसांना दाखविले. दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीसुद्धा दुचाकी चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, कामुंजा येथील श्रीकांत माणिक बनसोड यांच्या लेखी तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)महाठक किशोर भुगूलराजेश बंड या आरोपीच्या तुलतेन किशोर भुगूल हा फसवणुकीचा मास्टर माइंड असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. तो अत्यंत धूर्त असून त्याने स्वत:ची ओळख लपवून शेतकऱ्यांना नाडवले आहे. ठाकरे, मेश्राम, बडगे अशा विविध आडनावांचा वापर त्याने पंचायत समितीचा अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी केला. पोलिसी हिसका दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.पांडेंच्या पथकाची कारवाईगुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. आयुक्तालय हद्दीतील वाढत्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा तपास सुरू असताना हा प्रकार उघड झाला. पांडे यांच्या समवेत उपनिरीक्षक प्रवीण पाटील, दिलीप वाघमारे, जमादार संजय बाळापुरे, सुभाष पाटील, नीलेश जुनघरे, संग्राम भोजने, अमर बघेल, दर्शना वानखडे आदींनी ही कारवाई केली.