शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गजभियेच्या पत्नीला पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:42 IST

शीतल पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी अ‍ॅड. सुनील गजभियेची पत्नी राजेश्रीला गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली.

ठळक मुद्देआज सुनीलची पेशी : विहिरीचा उपसा करून मोबाइलची शोधमोहीम

आॅनलाईन लोकमतअमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी अ‍ॅड. सुनील गजभियेची पत्नी राजेश्रीला गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी एक्स्प्रेस हायवेवरील जुना टोलनाका स्थित घटनास्थळीच्या विहिरीतील पाणी उपसून मोबाइलचा शोध घेतला.शीतलचा बूट काढला विहिरीबाहेरसुनील गजभिये व रहमान यांनी शीतलचा मृतदेह विहिरीत फेकल्यानंतर तिचा मोबाइलसुद्धा विहिरीत टाकला. सदर विहीर मोठी असून, त्यात ४० फुटांपर्यंत पाणी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मंगळवारी गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय जी.टी. पवार यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मशीनने विहिरीचा उपसा सुरू केला. पाणी पुष्कळ असल्यामुळे पाण्याचा उपसा तळापर्यंत झाला नाही. तथापि, शीतलचा दुसरा बूट विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी सुनील गजभियेला या विहिरीजवळ आणले होते.दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून सुनील गजभियेने हत्या केली आणि दोघांनी मृतदेह विहिरीत फेकल्याची कबुली रहमानने गाडगेनगर पोलिसांना दिली आहे. हत्येचे गूढ उकलल्यानंतर आता गाडगेनगर पोलीस गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यासाठी सुनील व रहमानची पोलीस कोठडीत चौकशी करीत आहेत. या आरोपींना आश्रय देणाऱ्या गडचिरोलीतील शिवदास गोंडाणेला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी पोलिसांनी सुनील गजभियेची पत्नी राजेश्री (४५, रा. कुसुम कॉलनी, रविनगर) हिला अटक करण्यात आली. राजेश्रीने हत्येच्या सुनियोजित कटात आरोपींना मदत केली. तिने सुनीलचा मोबाइल घरी ठेवला तसेच रहमानला शहराबाहेर राहण्याचा सल्ला देऊन त्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले. या अनुषंगाने गाडगेनगर पोलिसांनी राजेश्रीविरुद्ध कलम २०१, २१२, १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यातील सुनील गजभियेची पोलीस कोठडी २८ मार्च रोजी संपेल. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.