शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गब्बरसिंग आणि सिंघम उतरले मैदानात; मेळघाटातील आग संरक्षणासाठी झळकले पोस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 13:13 IST

Amravati News मेळघाटातील जंगलात उन्हाळ्यात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी सोशल मीडियावर अपलोड करण्यात येणारे शोले सिनेमातील गब्बरसिंग आणि ठाणेदार सिंघम यांचे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे.

ठळक मुद्देजंगलात आग,पाच हजार दंड, दोन वर्ष शिक्षा

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील जंगलात उन्हाळ्यात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने आदिवासी पाड्यांच्या दर्शनी भागावर संरक्षणार्थ फलक लावण्यात येतात. अशातच सोशल मीडियावर अपलोड करण्यात येणारे शोले सिनेमातील गब्बरसिंग आणि ठाणेदार सिंघम यांचे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे.मेळघाटच्या जंगलात दरवर्षी आगी लावण्याचे प्रकार सर्वाधिक प्रमाणात घडत आहेत. त्यात हजारो हेक्टर जंगलाची राखरांगोळी होते. दुसरीकडे साप, विंचू अशा सरपटणा?्या प्राण्यांपासून वाघ, अस्वल, बिबट, रानगवे, हरिण, सांबर, नीलगाय आदी प्राण्यांना जंगलात जीव वाचवीत सैरभर पळावे लागत आहे. या आगीत प्राण्यांचा होरपळून मृत्यूसुद्धा होतो. ही आग वन्यप्राण्यांसह मेळघाटच्या घनदाट अरण्याची राखरांगोळी करणारी ठरते. कोट्यवधी रुपयांची वनसंपदा यात जळून खाक होत असल्याचे वास्तव आहे.मानवनिर्मित आगी सर्वाधिक प्रमाणातमेळघाटच्या जंगलात लागणारी आग ही पूर्वी बांबूंच्या घर्षणाने उन्हाळ्यात लागत असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र आग मानवनिर्मित असल्याचे सत्य आहे. वन आणि व्याघ्र प्रकल्प त्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती करते. मेळघाटच्या जंगलात मोहाची झाडे सर्वाधिक आहेत. त्याची मोहाफूल लवकर वेचता यावी, जंगलात गवतात पडलेली बारसिंग वेचण्यासह, तेंदुपत्ताला येणारी कोवळी पाने लवकर फुटावी. दुसरीकडे गुराढोरांसाठी चांगले गवत उगावे, यासाठी या आगी लावल्या जात असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे.जीवघेणी कसरत, उलटी बत्तीचा प्रयोगमेळघाटचे जंगल उंच-सखल टेकड्यांमध्ये वसलेले आहे. जंगलात आग लागल्यावर ती पाहण्यासाठी मचाणीची व्यवस्था, दुसरीकडे आता सॅटॅलाइटने माहिती मिळवण्याचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात आग लागलेल्या ठिकाणी जाण्यासाठी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागते. आग विझवण्यासाठी पाण्याचे बंब किंवा हेलिकॉप्टर आदींचा प्रयोग मेळघाटात शक्य नाही. जंगलात आग लागल्यास ब्लोअर मशीनचा वापर होतो. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्यास ती रोखण्यासाठी काही अंतरावर दुसरीकडून आग लावल्या जाते त्याला उलटी बत्ती असे म्हणतात. हा प्रयोग आजही मेळघाटात करावा लागत आहे.अरे ओ सांभा.... आली रे आली आताजंगलातील आग ही मानवनिर्मित असल्याने मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून सोशल मीडियावर सुद्धा आता शोले चित्रपटातील ह्यअरे ओ सांभा जंगल मे आग लगाने पे सरकार कितना जुमार्ना रखे है, सरदार पुरे पाच हजार और दो साल की जेल, यासह सिंघम चित्रपटातील ह्यआली रे आली आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आलीह्ण असे पोस्टर अपर प्रधान मुख्य संरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी सोशल मिडियावर अपलोड केले आहेत.

टॅग्स :fireआगforest departmentवनविभाग