लोकमत न्यूज नेटवर्कबड़नेरा : जुनी वस्ती, माळीपुऱ्यातील ५८ वर्षीय संक्रमित महिलेच्या मृतदेहावर प्रशासनाने चौथ्या दिवशी अंत्यसंस्कार केले. ‘लोकमत’मध्ये याविषयीचे वृत्त झळकताच प्रशासनाला जाग आली.जुन्या वस्तीतील पॉझिटिव्ह पती-पत्नीवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच दिवशी ५८ वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला. मृत महिलेचे पतीवर उपचार सुरु आहे. या दांपत्यांचे दोन मुले काही वर्षांपूर्वी मृत आहेत. सून मुंबईला असल्याने तातडीने येणे शक्य नसल्याने काही जवळच्या नातेवाईकांनी शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करावे, असे सांगितल्यानंतरही कागदी घोड्यांच्या सोपस्कारात हा मृतदेह तीन दिवस अंत्यसंस्कारापासून दूर होता. २४ जूनला महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले. मृत महिलेस सख्खे नातेवाईक नसल्याने काही चुलत नातेवाईकांनी प्रशासनाला सुरुवातीलाच शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करून घेण्याचे सांगितले. तरीही चार दिवस या मृतदेहाला अंत्यसंस्काराची वाट का पहावी लागली, असा सवाल या घटनेतून उपस्थित झाला कोविडच्या मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार केला जावा, असे शासनाचे आदेश आहेत. अंत्यसंस्कार करण्याआधीच मृत महिलेच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार झाल्याची माहिती देण्यात आली. असे का करण्यात आले, असा सवाल आता शहर वासियांमध्ये चर्चिला जात आहे
संक्रमित महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST
जुन्या वस्तीतील पॉझिटिव्ह पती-पत्नीवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच दिवशी ५८ वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला. मृत महिलेचे पतीवर उपचार सुरु आहे. या दांपत्यांचे दोन मुले काही वर्षांपूर्वी मृत आहेत. सून मुंबईला असल्याने तातडीने येणे शक्य नसल्याने काही जवळच्या नातेवाईकांनी शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करावे, असे सांगितल्यानंतरही कागदी घोड्यांच्या सोपस्कारात हा मृतदेह तीन दिवस अंत्यसंस्कारापासून दूर होता.
संक्रमित महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
ठळक मुद्देचौथा दिवस उजाडला : वृत्त झळकताच महापालिका प्रशासनाला आली जाग