शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

एटीसी कार्यालयाचे कामकाज रेंगाळले

By admin | Updated: June 3, 2015 23:58 IST

येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तपदाचा तिढा कायम आहे.

कधी तू, कधी मी : अधिकारी पदाचा तिढा कायमअमरावती : येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तपदाचा तिढा कायम आहे. अप्पर आयुक्त म्हणून अशोक आत्राम की महादेव राघोर्ते यापैकी कोणी कामकाज कोणी हाताळावे, हे अद्यापही शासनाने निश्चित केले नाही. परंतु सोयीनुसार ‘कधी तू, कधी मी’ असा स्वाक्षरी करण्याचा शिरस्ता सुरु असल्याने एकुणच कामकाज रेंगाळल्याची स्थिती आहे.शासनाने आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तपदावरुन अशोक आत्राम यांची उचबांगडी केली. शासन निर्णयाविरुद्ध आत्राम हे प्रशासकीय लवादात गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून आत्राम यांनी बदलीच्या निर्णयाविरुद्ध ‘स्टेटस्- को’ मिळविला. या संदर्भात १० जून ही न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. दरम्यान आत्राम यांच्या बदलीचे आदेश शासनाने पाठवून त्यांचा कारभार उपायुक्त महादेव राघोर्ते यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. एकतर्फा पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया शासन निर्णयानुसार पार पाडून राघोर्ते यांच्या कार्यवाहीची माहिती शासनाला कळविण्यात आली. परंतु गत आठवड्यात आदिवासी अप्पर आयुक्त (एटीसी) पदावरुन सुरुझालेले वादळ शमण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. अशोक आत्राम यांनी प्रशासक ीय लवादात धाव घेतल्याने अप्पर आयुक्त पदाची सुत्रे कोणी हाताळावी हा निर्णय घेणे शासनाला कठीण झाले आहे. आत्राम यांच्या बदलीला ‘स्टेटस्- को’ देताना न्यायालयाने आदेशात काय म्हटले याची चाचपणी करण्यासाठी या आदेशाची प्रत आदिवासी विकास विभागाच्या सचिवांनी मंगळवारी न्यायालयातून मागविली असल्याची माहिती आहे. विधी व न्याय मंत्रालयात यासंदर्भात निर्णयासाठी हा आदेश पाठविण्यात आला आहे. परंतु बुधवारी उशिरापर्यत अप्पर आयुक्त पदाची सुत्र कोणाकडे हा निर्णय झाला नाही, हे विशेष. तर दुसरीकडे अशोक आत्राम आणि महादेव राघोर्ते हे दोन्ही अधिकारी एटीसी म्हणून सोयीनुसार फाईलींवर स्वाक्षरी करीत असल्याची माहिती आहे. नेमके अप्पर आयुक्त कोण? हे गुलदस्त्यात असताना काही मलईदार फाईलींवर स्वाक्षरी करण्यात आल्या तर या बाबीला जबाबदार कोण राहिल, हा महत्त्वाच्या प्रश्न कायम आहे. निविदा प्रक्रिया, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, साहित्य खरेदी आदी महत्त्वाचे कामकाज कधी सुरळीत होणार हा सवाल निरुत्तरीत आहे. आदिवासी समाजाला न्याय आणि विकास करता यावा, स्थापन केलेले अप्पर आयुक्त कार्यालयात भष्ट्राचार गाजत असल्याचा इतिहास आहे.दोन अधिकाऱ्यांच्या अधिकाराने कर्मचारी हैराणआदिवासी विकास विभागात अप्पर आयुक्तपदी दोन अधिकारी कायम आहेत. त्यामुळे फाईलीवर स्वाक्षरी कोणाची घ्यावी, या बुचकळ्यात कर्मचारी आहेत. आत्राम किंवा राघोर्ते हे दोघेही अप्पर आयुक्त म्हणून रुबाब दाखवित असल्याने या कार्यालयातील कर्मचारी हैराण झाले आहेत. एक खुर्ची अन् दोन अधिकारी? असा एटीसी कार्यालयाचा कारभार सुरु आहे. यात सर्वाधिक अडचण ही कर्मचाऱ्यांची होत असल्याचे दिसून येत आहे.