शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य संग्राम सेनानी लक्ष्मणबुवा कदम कालवश, ७० वर्षे अव्याहत जनजागृती, लोकमतनेही केला होता गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 17:59 IST

नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी व राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्यातकीर्त लक्ष्मणबुवा माधवजी कदम (ब्रह्मभट्ट) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी व राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्यातकीर्त लक्ष्मणबुवा माधवजी कदम (ब्रह्मभट्ट) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्य चळवळतील एक तारा निखळला आहे.वयाच्या १८ व्या वर्षांपासूनच श्रोत्यांना तासन्तास खिळवून ठेवून कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे लक्ष्मणबुवा हे या तालुक्याचे भूषण होते. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, कैकाडी महाराज या महापुरुषांचा सहवास लाभला होता. संतांचा उपदेश तसेच सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विषय निवडून कीर्तनाच्या माध्यमातून ७० वर्षे त्यांनी जनजागृतीचे अव्याहत कार्य केले. महाराष्ट्रातील गावागावांत त्यांनी हजारो कीर्तने केली. अन्य राज्यातही त्यांची कीर्तन झालीत. २००१ साली लोकमतच्या त्रिदशकपूर्ती सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना गौरवान्वित करण्यात आले होते. गेल्या चार वर्षांपासून प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांनी कीर्तनाला विराम दिला. सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी इंदिरा, मुलगा शरद, सीमा व वनिता या मुली, सुना व नातवंडं असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. शासनाच्यावतीने तहसीलदार मनोज लोणारकर यांनी पुष्पचद्र वाहून श्रद्धांजली दिली. त्यांच्या पार्थिवावर नांदगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले.असे मेले कोट्यांकोटी, काय रडू लेकासाठी ?२००४ साली चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावातील कीर्तनादरम्यान त्यांना मुलगा नीलेश यांच्या मृत्यूची वार्ता मिळाली. त्यांनी कीर्तन न थांबविता ते पूर्ण करूनच जाऊ, असा निश्चय केला. त्यांनी या कीर्तनात ह्यअसे मेले कोट्यांकोटी, काय रडू लेकासाठी? असे म्हणत कीर्तन पूर्ण केल्याची आठवण याप्रसंगी त्यांच्या ओळखीतल्या अनेकांनी जागविली.

टॅग्स :Amravatiअमरावती