अमरावती : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामांना गती मिळाली आहे. तलाव व धरणातील गाळ काढण्यात येणार असल्याने यंदा शेतकऱ्यांना मोफत गाळ मिळणार आहे. शेतकरी गाळ वाहून नेण्याकरिता किती व कशी तयारी करतात यावर ते अवलंबून आहे.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी शासनाने या वर्षीपासून जलयुक्त शिवार उपक्रम सुरू केला. यासाठी जिल्ह्यातील २७५ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये कामाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना गाळ मिळविण्यासाठी कसरत करावी लागत असे. अनेक ठिकाणी गाळ उपलब्ध नसतो, गाळ असतो तर तो काढणे, वाहून नेणे यासाठीचा खर्च परवडत नाही.
शेतकऱ्यांना मोफत गाळ
By admin | Updated: March 22, 2015 01:21 IST