शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

‘मोफत सायकल वाटप’चा मेसेज बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:01 IST

‘मोफत सायकल वितरण योजना, भारत सरकार’ मोठ्या प्रमाणावर ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर व्हायरल होत आहे. सर्व व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर या योजनेचा महापूर आलेला आहे. तथापि, अशी योजना नगर परिषद, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमार्फत राबविली जात नसल्याची माहिती समोर आलेली आहे.

ठळक मुद्देवैयक्तिक माहिती लिक होण्याचा धोका : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर महापूर
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअचलपूर : ‘मोफत सायकल वितरण योजना, भारत सरकार’ मोठ्या प्रमाणावर ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर व्हायरल होत आहे. सर्व व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर या योजनेचा महापूर आलेला आहे. तथापि, अशी योजना नगर परिषद, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमार्फत राबविली जात नसल्याची माहिती समोर आलेली आहे. कोणत्याही शासकीय योजनेच्या नावाने वेबसाइटवर माहिती देताना, भरताना त्यात आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने होत आहे.‘फ्री सायकल वितरण योजना, भारत सरकार. सभी लडके और लडकियों को मिलेगी मुफ्त में सायकल. सभी सायकल १५ आॅगस्ट २०१८ को बांटी जाएगी’ असा संदेश देत ‘ँ३३स्र://इँं१ं३-रं१‘ं१.ूङ्म/साईकिल’ या लिंकवर ‘कृपया इस मैसेज को अपने दोस्तो, रिश्तेदारो और सारे ग्रुप्स में शेअर करे ताकी सभी विद्यार्थी इस योजना का लाभ उठा सके’ अशी विनंती करण्यात आली आहेदरम्यान, सदर प्रतिनिधीने या व्हायरल मेसेजमधील लिंकवर क्लीक करताच नरेंद्र मोदींचा फोटो राजमुद्रेसह झळकला व ‘प्रधानमंत्री साईकिल योजना २०१८’ असे एक पेज ओपन झाले. त्यामध्ये नाव नोंदणीसाठी आॅनलाइन अर्ज आहे. पूर्ण नाव, वडिलांचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, गाव व राज्याचे नाव याची माहिती भरल्यानंतर ‘रजिस्टर’ या बटनावर क्लिक केल्यावर व्हेरिफिकेशनसाठी हा मेसेज १० मित्रांना शेअर करा, नंतरच तुमचा एमआयआर कोड येणार, असा मेसेज येतो. त्यानंतर एकूण १० मेसेज पाठविल्यानंतरसुद्धा काहीच येत नाही. एकूणच हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. हा व्हायरल मेसेज बोगस असण्याची शक्यता जास्त आहे. सध्या संपूर्ण अचलपूर तालुक्यासह अमरावती जिल्ह्यात नागरिकांमध्ये या मेसेजबाबत चर्चा, चौकशी होत आहेत. झेरॉक्स सेंटर, आॅनलाईन कॅफेवर नागरिक ‘या फ्री सायकल योजनेचे अर्ज उपलब्ध आहे का?’ अशी विचारणा करू लागले आहेत. पंतप्रधानांचे छायाचित्र झळकत असल्याने चटकन विश्वास बसत असला तरी मोफत सायकल वाटप योजना बोगस असल्याचीच माहिती समोर येत आहे.दरम्यान पंतप्रधानाच्या नावावर सायकल योजनेसंदर्भात कुठलीही योजना प्रशासनाकडे नाही. नागरिकांनी आमिषाला भुलू नये, अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी दिली.अचलपूर ठाण्याला अशा प्रकारची कोणतीही तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यावर निश्चित कारवाई करू.- आधारसिंग सोनोने, ठाणेदार, अचलपूर.