शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हळद खरेदी-विक्री प्रकरण, एक कोटी ९१ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 16:44 IST

-  अनिल कडू अमरावती- हळद उत्पादक शेतक-यांकडून हळद नेल्यानंतर शेतमालाचे पैसे न मिळाल्यावरून अचलपूरच्या २० शेतक-यांनी अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात १ कोटी ९१ लक्ष रुपयांनी फसवणूक झाल्याचे शेतक-यांनी म्हटले आहे. अतुल साहेबराव लव्हाळे रा. ढंगारखेडा, ता. कारंजा लाड, ह.मु. अमरावतीसह अन्य दोन अशा एकूण तिघांविरुद्ध शेतकºयांनी ही ...

-  अनिल कडू अमरावती- हळद उत्पादक शेतक-यांकडून हळद नेल्यानंतर शेतमालाचे पैसे न मिळाल्यावरून अचलपूरच्या २० शेतक-यांनी अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात १ कोटी ९१ लक्ष रुपयांनी फसवणूक झाल्याचे शेतक-यांनी म्हटले आहे. अतुल साहेबराव लव्हाळे रा. ढंगारखेडा, ता. कारंजा लाड, ह.मु. अमरावतीसह अन्य दोन अशा एकूण तिघांविरुद्ध शेतकºयांनी ही तक्रार दिली आहे. सरमसपुरा पोलीस ठाण्यासह या शेतकºयांनी ही तक्रार जिल्हाधिकाºयांकडे दिली आहे. आमच्याकडून नेलेल्या हळदीचे त्या-त्या वर्षीच्या बाजारभावाप्रमाणे आम्हाला पैसे मिळवून द्यावे आणि न्याय मिळवून द्यावा, असे शेतक-यांनी सादर तक्रारीत म्हटले आहे. लव्हाळे यांनी अचलपूरमधील हळद उत्पादक शेतक-यांच्या गटासोबत चर्चा केली. गटातील शेतक-यांनी सभा घेतली. हळदीला बाजारभावापेक्षाही अधिक ज्यादा भाव देण्याची हमी शेतक-यांना दिली. ज्यादा भाव मिळतो म्हणून आपल्या शेतातील हळद त्याने सुचविल्याप्रमाणे मोजून दिली. पहिल्या टप्प्यात त्याने शेतक-यांना पैसेही दिले. लव्हाळे याने ही हळद व्यापा-याला पुरविल्याचे, विकल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, त्याने नोटबंदीचे कारण पुढे केले. हळद उत्पादक शेतक-यांच्या शेतमालाचे पैसे थांबवलेत. पैसे थांबल्यावरही अचलपूरच्या शेतक-यांनी विश्वासापोटी लव्हाळेला हळद पुरविली. थकलेले पैसे मिळावेत म्हणून शेतक-यांनी त्याच्यासोबत सतत संपर्क साधला. वेळोवेळी भेटी घेतल्या. पैशाची मांगणी केली. पण, त्यांना पैसे मिळाले नाहीत. अखेर त्यांनी जिल्हाधिकारी व सरमसपुरा पोलीस ठाण्याला तक्रार दिली. हळद विक्री व्यवहारात १० शेतक-यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे १ कोटी २६ लाख, शिरखेड पोलिसांत २१ शेतक-यांनी १ कोटी ७३ लाख, कु-हा पोलिसांत २० शेतक-यांनी १ कोटी ९१ लाखांनी फसगत केल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हळद खरेदी विक्री प्रकरणात फसगत झालेल्या शेतक-यांची संख्या दीडशेच्यावर असल्याचे सांगितले जात आहे. अचलपूरच्या शेतक-यांची तक्रार वेगळी आहे. यातील शेतकºयांची स्वत:जवळील रोख पैसे या हळद खेरेदी-विक्री व्यवहारात गुंतलेले नाहीत. गेलेल्या हळदीचेही शेतक-यांनी त्या-त्या वर्षीच्या बाजारभावाने पैसे मागितले आहेत. शिरखेड आणि कु-हा पोलिसात शाखा अभियंता श्रीधर हुशंगाबादे यांच्याविरुद्ध तक्रार असली तरी सरमसपुरा पोलिसांत शेतकºयांनी दिलेल्या तक्रारीत हुशंगाबादेंच्या नावाचा उल्लेख नाही. 

जिल्हाधिका-यांना दिलेल्या तक्रारीची प्रत शेतकºयांनी आमच्याकडे दिलेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. - अभिजित अहिरराव,ठाणेदार, सरमसपुरा

टॅग्स :Amravatiअमरावतीagricultureशेती