शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

'केम'चे प्रकल्प संचालक चौधरींविरुद्ध अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 10:40 IST

'कृषी समृद्धी : समन्वयित कृषी विकास' प्रकल्प (केम) च्या प्रकल्प संचालकपदी असताना शासन रकमेचा अपहार करणारे गणेश एम. चौधरी (५४) यांच्याविरुद्ध अखेर मंगळवारी सायंकाळी येथील गाडगेनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे पैसे लाटले 'लोकमत'ने केला होता भ्रष्टाचार उघड

गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : 'कृषी समृद्धी : समन्वयित कृषी विकास' प्रकल्प (केम) च्या प्रकल्प संचालकपदी असताना शासन रकमेचा अपहार करणारे गणेश एम. चौधरी (५४) यांच्याविरुद्ध अखेर मंगळवारी सायंकाळी येथील गाडगेनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.'लोकमत'ने वर्षभरापूर्वी गणेश चौधरींचा हा भ्रष्टाचार पुराव्यासकट उघड करून शोधवृत्तमालिका प्रकाशित केली होती. नागपूरच्या ए.एस. कुळकर्णी आणि असोसिएट्स यांनी केलेले लेखापरीक्षण आणि त्यातील आक्षेप 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले होते. मंत्रालयातील कृषी व पणन खात्यात त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. कृषी व पणन खात्याचे अवर सचिव विजय कुमार यांनी 'लोकमत'च्या वृत्ताचे कात्रण जोडून त्याआधारे अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांना अहवाल मागितला होता. सिंह यांनी वृत्तातील माहितीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर विजय कुमार यांनी गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले होते.

काय आहे प्रकल्प?विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. विदर्भातील यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, अमरावती, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांचा त्यात समावेश होता. राज्य शासनाने डिसेंबर २००९ साली हा प्रकल्प हाती घेतला. २०१७ पर्यंत उद्दिष्टपूर्ती होऊन हा प्रकल्प थांबायला हवा होता; तथापि प्रशासकीय अनियमिततेमुळे दोन वेळा कालमर्यादा वाढविण्यात आली. गणेश चौधरी हे प्रकल्प संचालक होते. १ एप्रिल २०१६ रोजी पदभार स्वीकारून दीड वर्षे ते पदावर होते. त्यांच्यानंतर अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह हे प्रकल्प संचालकपदी नेमले गेले. चौधरी हे हल्ली मुंबईच्या कोेकण भवनात उपायुक्तपदी कार्यरत आहेत.

लोकप्रतिनिधींचा दमदार पाठपुरावाअमरावती विभागातील आमदारत्रयींनी गणेश चौधरींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा दमदारपणे उचलून धरला. धामणगावचे आमदार वीरेंद्र जगताप, तिवसा येथील आमदार यशोमती ठाकूर आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी मुद्दा रेटून शासनावर दबाव आणला. गणेश चौधरी यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाची विधिमंडळात कोंडी केली. शासनाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. अनेक मार्ग अवलंबून चौकशी दाबणाऱ्या, कारवाई थांबविणाऱ्या गणेश चौधरी यांच्याविरुद्ध अखेर मंगळवारी गुन्हा नोंदविला गेलाच. या कारवाईने शेतकऱ्यांमध्ये आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.‘लोकमत’ने उघड केलेला मुद्दा पोलीस तक्रारीतआंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी) यांच्यासोबत झालेल्या करारानुसार वस्तू खरेदीकरिता १ लक्ष यूएस डॉलर्स व सेवादी कार्यासाठी ५० हजार यूएस डॉलरची खरेदी करावयाची असल्यास आयएफएडीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. गणेश चौधरींनी ती परवानगी घेतली नव्हती. आयएफएडीने त्यावर आक्षेप घेतला. ‘लोकमत’ने उघड केलेला हा प्रमुख मुद्दा पोलीस तक्रारीतील महत्त्वाचा भाग ठरला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील लेखाधिकारी दिगांबर विश्वनाथ नेमाडे यांनी पोलिसात नोंदविलेल्या तक्रारीत त्याचा उल्लेख आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी