अल्टिमेटम : अमानुष मारहाणीचे प्रकरणअमरावती : सामान्य व्यक्तिला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी सहायक पोलीस निरीक्षकांसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिशी बजावल्या.स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक व चार पोलीस कर्मचारी ट्रक चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भोकरी-घोगर्डा फाटा येथे गेले होते. ट्रक चोरी गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविल्याची माहिती बाळकृष्ण रोंघे यांनी पोलिसांना दिली. परंतु ‘येथे नेतागिरी करायला आला का?’ असे म्हणून रोंघे यांना अमानुष मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी रोंघे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी या घटनेचा तपास दर्यापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ए.व्ही.गायकवाड यांच्याकडे सोपविला होता. याप्रकरणी प्रभू यांनी सहायक पोलीस निरीक्षकांसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्याविरूध्द कारवाई का करू नये? या आशयाची नोटीस बजावल्याची माहिती वीरेश प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
एपीआयसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना ‘शोकॉज’
By admin | Updated: September 22, 2014 23:11 IST