शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चार मिनिटे आॅनलाईन मूल्यांकन अनिवार्य, अमरावती विद्यापीठाचा निर्णय, प्राध्यापकांना सक्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 16:55 IST

मुंबई विद्यापीठाच्या निकालांमध्ये झालेल्या गोंधळानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आॅनलाईन मूल्यांकनासाठी संबंधित प्राध्यापकांना  चार मिनिटांचा कालावधी अनिवार्य केला आहे.

- गणेश वासनिक अमरावती, दि. २५ - मुंबई विद्यापीठाच्या निकालांमध्ये झालेल्या गोंधळानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आॅनलाईन मूल्यांकनासाठी संबंधित प्राध्यापकांना  चार मिनिटांचा कालावधी अनिवार्य केला आहे. याअनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून हिवाळी परीक्षांचे मूल्यांकन या नवीन निर्णयानुसार केले जाणार आहे.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा विभागाचा कारभार आॅनलाईन करणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने परीक्षा विभागाने वाटचाल चालविली आहे. मात्र, आॅनलाईन मूल्यांकनाचा दर्जा सुधारावा, यासाठी प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी आता चार मिनिटे द्यावीच लागतील, त्याशिवाय आॅनलाईन मूल्यांकन प्रक्रिया पुढे सरकणार नाही, याअनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी आॅनलाईन मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना वेळेचे बंधन नव्हते. त्यामुळे आॅनलाईन मूल्यांकन झपाट्याने होत होते. परंतु मूल्यांकनात गोंधळ, घोळ झाल्याच्या तक्रारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.  यापार्श्वभूमीवर प्राध्यापकांना किमान चार मिनिटे पेपर तपासणे कुलगुरूंनी अनिवार्य केले आहे. पेपरचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी संबंधित विषयाच्या प्राध्यापकांवर सोपविली जाते. त्यात घोळ झाल्यास विद्यार्थ्यांचा विद्यापीठ प्रशासनावरच रोष असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  मूल्यांकनादरम्यान प्राध्यापकाचे नाव, मूल्यांकन सुरु आणि पूर्ण झाल्याची वेळ, गुण वन अन्य माहिती विभागप्रमुखांना क्षणात बघता येईल, असा नवा बदल सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आला आहे. 

- तर प्राध्यापकांना पेपर रिजेक्टचे अधिकारआॅनलाईन मूल्यांकन करताना संबंधित प्राध्यापकांना पेपर अस्पष्ट किंवा संशयास्पद दिसून आल्यास त्यांना पेपर रिजेक्ट करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. पेपर रिजेक्ट करुन तो परीक्षा विभागाकडे निर्णयार्थ पाठवू शकतील, अशी माहिती आहे. 

‘त्या’ प्राध्यापकांची चौकशी होणारयापूर्वी आॅनलाईन मूल्यांकनास कमी वेळ देणाºया प्राध्यापकांची चौकशी केली जाणार आहे. त्यानुसार कुलगुरु  मुरलीधर चांदेकर यांनी पावले उचलली आहेत. आॅनलाईन परीक्षा, मूल्यांकन व निकालात पारदर्शता, अचुकता आणण्यासाठी योग्य ते निर्णय घेतले जात आहेत.

पेपरचे मूल्यांकन करणारी यंत्रणा ही प्राध्यापक मंडळी आहे. त्यामुळे आॅनलाईन पेपर मूल्यांकनात अचुकता, दर्जा सुधारावा, याकरिता प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी आता कमीतकमी चार मिनिटे द्यावी लागतील. कुलगुरूंच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.- जयंत वडतेसंचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ,   संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.                        

टॅग्स :Studentविद्यार्थी