चांदूर रेल्वे : महावितरणने चांदूर रेल्वे तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात २५ वीज ग्राहकांची वीजचोरी पकडून ४ लाखाचा दंड वसूल केला.
कार्यकारी अभियंता आलेगावकर, अधीक्षक अभियंता खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे येथील उपकार्यकारी अभियंता सागर नाईक यांच्या नेतृत्वात महावितरणच्या चमूने मीटर टॅप, हूक तसेच खंडित वीज जोडणी स्वत: सुरू करून अवैध वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर कारवाई केली. यामध्ये चांदूर रेल्वे शहरातील दोन, राजुरा येथील आठ, घुईखेड येथील ११ तसेच इतर गावांतील चार अशा एकूण २५ विज ग्राहकांवर कारवाई करून चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत चांदूर रेल्वे येथील कनिष्ठ अभियंता सूरज मेश्राम, तायडे, सहायक अभियंता नीलेश रोठे, मनीष फरकाडे, राहुल चिखलकर यांच्यासह घुईखेड, राजुरा व महावितरणच्या ग्रामीण केंद्रांचे कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली.