शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरांवर बिबट्याचा हल्ला, चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:29 IST

शेतात कापूस वेचताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर अचानक हल्ला केला. यात दोन महिला, एक शेतकरी व एक वन कर्मचारी जखमी झाले.

ठळक मुद्देएका वनकर्मचाऱ्याचाही जखमीमध्ये समावेश नांदगाव शिवारात पहिलीच घटना 

अमरावती : शेतात कापूस वेचताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून चौघांना जखमी केले. जखमींमध्ये दोन महिला, एक शेतकरी व एक वन कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ही घटना नांदगाव पेठ शिवारात संगमेश्वर रस्त्याजवळील जाधव यांच्या शेतात बुधवारी सकाळी १०.३० दरम्यान घडली. या परिसरातील ही पहिलीच घटना असल्याने रमाकांत जयस्वाल म्हणाले.

नागपूर हायवेनजीनक संगमेश्वर रस्त्यावर दुचाकी शोरूमचे संचालक राजाभाऊ जाधव यांचे शेत आहे. नांदगाव पेठ येथील रमाकांत जयस्वाल यांनी ते सहा एकर शेत लागवणने केले आहे. बुधवारी सकाळी ९वाजता कापूस वेचणीकरिता मजूर शेतात आले होते. सर्व महिला मजूर कापूस वेचत असल्याने एचानक पऱ्हाटीच्या झाडाखाली दबा धरून बसलेल्या महिलेवर हल्ला केला. आरडाओरड झाल्याने तो पळाला. मात्र, भीती कायम राहिल्याने काहींनी गावातून फटाके आणून फोडले.

वनविभागाला याची माहिती देण्यात आली. अवघ्या २० मिनिटात पोहरा चिरोडी बिटचे वनकर्मचारी ताफ्यासह दोन वाहन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेवढ्यात बिबट पुन्हा दिसला. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात शेतकरी एक वनकर्मचारी आणि शेतकरी विवेक रमाकांत जयस्वाल (३०) हा जखमी झाला. बिबट चवताळ्याने त्याला ट्रँगुलाईझ करून वनकर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यात कैद केले नि वडाळी बिटमध्ये आणून ठेवले आहे.

अडीच वर्षांचा बिबट भरकटला

नांदगाव शिवारात आतापर्यंत बिबट आढळल्याचे ऐकिवात नाही. मात्र, अचानक ही घटना पहिल्यांदाच घडली. २ ते अडीच वर्षांचा तो बिबट शिकार करण्याच्या नादात या परिसरात भरकटला असावा, असा कयास वनकर्मचाऱ्याने वर्तविला.

एकाचा इर्विनमध्ये उपचार सुरू

नांदगाव पेठ येथील बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलेसह एक युवक जखमी झाला. मात्र, महिलांना किरकोळ जखम असल्याने प्राथमिक उपचाराअंती सुटी देण्यात आली असून, विवेक जयस्वाल यांच्या दोन्ही हाताला, छातीवर व पाठीवर जखम असल्याने उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याwildlifeवन्यजीव