शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

चौघांच्या टोळक्याकडून दीड तासात वाटमारीचा चौकार, पोलिसांकडून एकच एफआयआर

By प्रदीप भाकरे | Updated: April 19, 2024 14:26 IST

१८ एप्रिल रोजी चार जणांच्या टोळक्याने अवघ्या दिड तासात चौघांना लुटले. या चार घटनांप्रकरणी चार स्वतंत्र एफआयआरऐवजी गाडगेनगर पोलिसांनी सायंकाळी एकच एफआयआर नोंदविला.

अमरावती: चार जणांच्या टोळक्याने अवघ्या दीड  तासात चौघांना लुटले. यात चार मोबाईल, सोन्याची पोथ व रोख रक्कम हिसकावण्यात आली. १८ एप्रिल रोजी दुपारी १२ ते दीड या कालावधीत ती जबरी चोरीची मालिका घडली. वाटमारीच्या या चार घटनांप्रकरणी चार स्वतंत्र एफआयआरऐवजी गाडगेनगर पोलिसांनी सायंकाळी एकच एफआयआर नोंदविला. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१२ च्या सुमारास याप्रकरणी, मंगेश किशोर वानखडे (३३, रा. कठोरा बू.) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार इसमांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

फिर्यादी मंगेश वानखडे १८ एप्रिल रोजी दुपारी १२ डवरगाव येथून डिजेचे काम आटपवून राजपुत धाबा ते जकात नाका चौक रोडवरील देशमुख फार्म हाऊस जवळ आले. त्यावेळी अज्ञात तीन इसम त्यांच्या वाहनासमोर आले. पेट्रोल है क्या, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर सामने चलो पेट्रोल देता हु, असे वानखडे यांनी म्हटले असता त्यातील एका इसमाने त्यांच्या गाडीची चाबी काढली. एकाने वानखडे यांचा गळा पकडून ‘तेरे पास जो है वह निकाल’, असे म्हणून त्यांच्या पँन्टच्या खिशातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल व नगदी तीन हजार रुपये जबरीने काढून घेतले. जाताना ते त्यांच्या दुचाकीची चाबी घेऊन गेले.

सलग चार घटना

वानखडे यांच्यानुसार, नंतर त्याच तीन इसमांनी त्याच्या आणखी एका साथीदारासह वलगाव रोडस्थित रजनी मंगल कार्यालय येथे एका व्यक्तीला धमकावून त्याच्याकडील १० हजार रुपयांचा मोबाईल व महिलेच्या गळ्यातील ८ हजारांची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोथ जबरीने हिसकून घेऊन गेले. तसेच गाडगेनगरस्थित ठाकरे मेडिकलसमोर रोशन काळे नामक मुलगा मित्रासोबत मोटार सायकलने जात असतांना त्याच आरोपींनी मागून येऊन त्याच्या हातातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल पळविला. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी जिल्हा स्टेडियम समोरुन पायदळ जात असलेल्या शंतनू वानखडे याच्याकडील १२ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. त्या मार्गाावरील सीसीटिव्ही तपासल्या जात आहेत.दीड तासाच्या कालावधीमधील त्या चारही घटना आहेत. चारही घटना सारख्या असल्याने एकच एफआयआर नोंदविण्यात आला. जकात नाका चौक ते जिल्हा स्टेडियमपर्यंतच्या त्या घटना आहेत.

हनुमंत गिरमे, ठाणेदार, गाडगेनगर

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी