अमरावती : अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांना घेऊन येणारे तीन चॉपर आणि एक हेलिकॉप्टर रविवारच्या सकाळी अमरावतीत उतरले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन शासकीय हेलिकॉप्टरने झाले. ना.नितीन गडकरी खासगी चॉपरने आले. लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा आणि गौतम सिंघानिया तसेच ना. सुभाष देशमुख व ना. सुभाष देसाई यांच्यासाठी दोन वेगवेगळे खासगी चॉपर अमरावतीत दाखल झाले होते. नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक परिसरात हेलिपॅड तयार करण्यात आले होते.माहि टेरिकॉट या प्रकल्पाचे लोकमत समूहाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेमंडचे गौतम सिंघानिया, ना.सुभाष देसाई, ना.प्रवीण पोटे, ना.सुभाष देशमुख, आ.रवी राणा, आ.यशोमती ठाकूर, आ.सुनील देशमुख आदी उपस्थित होते.या प्रकल्पात जागतिक दर्जाच्या टॉवेलची निर्मिती केली जाईल. पूर्णत: सेंद्रीय पद्धतीने उत्पादित कापसापासून ही टॉवेलनिर्मिती होईल. या प्रकल्पाचे संस्थापक उद्योजक सौरभ अग्रवाल यावेळी उपस्थित होते.
अमरावतीत उतरले चार हेलिकॉप्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:13 IST
अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांना घेऊन येणारे तीन चॉपर आणि एक हेलिकॉप्टर रविवारच्या सकाळी अमरावतीत उतरले.
अमरावतीत उतरले चार हेलिकॉप्टर
ठळक मुद्देनांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात वस्त्रनिर्मिती प्रकल्पांचे उद्घाटन