अमरावती : आरटी प्रवेशप्रक्रिया अंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेले १९८० विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपण्यास आता केवळ चार दिवस शिल्लक राहले असून, १५ दिवसांत ६१३ तात्पुरते, तर ६२ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. अजूनही १३०४ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या १९८० विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. परंतु आतापर्यंत केवळ ६१३ तात्पुरते आणि ६२ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले असून, १३०४ विद्यार्थ्यांचे प्रवेश प्राथमिक टप्प्यात आहेत. हे प्रवेश निश्चित झाले, तर उर्वरित विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत राज्यस्तरावर सोडत जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आरटीई प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परंतु आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात असून, या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
बॉक्स
आतापर्यंतचे तात्पुरते प्रवेश ६१३
जिल्ह्यातील शाळा २४४
उपलब्ध जागा २०७६
प्रवेश अर्ज ५९१८
सोडतीत निवड १९८०
प्रवेश निश्चित ६२