शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या गुणपत्रिकेचे लवकरच बदलणार स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 05:00 IST

सर्वोच्च  न्यायालयाने विधी अभ्यासक्रमाच्या  विद्यार्थ्यांनी सन २०१९ मध्ये सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विद्यापीठात गुणपत्रिकेच्या पॅटर्न एकच असावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने गुणपत्रिकेचे स्वरूप बदलविण्यासाठी तयारी चालविली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवर शैक्षणिक बाबी अंतर्भूत असणार आहे. पहिले सत्र ते शेवटच्या सत्रातील विषयनिहाय गुण, टक्केवारीदेखील गुणपत्रिकेवर अंकित असेल.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय निकषांची होणार पूर्तता, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

n  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणपत्रिकेचे स्वरूप बदलणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी लक्षात घेता आवश्यक ते बदल होणार आहे. गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास असणार आहे. उन्हाळी  २०२१ परीक्षेपासून सुधारित गुणपत्रिका मिळणार आहे.सर्वोच्च  न्यायालयाने विधी अभ्यासक्रमाच्या  विद्यार्थ्यांनी सन २०१९ मध्ये सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विद्यापीठात गुणपत्रिकेच्या पॅटर्न एकच असावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने गुणपत्रिकेचे स्वरूप बदलविण्यासाठी तयारी चालविली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवर शैक्षणिक बाबी अंतर्भूत असणार आहे. पहिले सत्र ते शेवटच्या सत्रातील विषयनिहाय गुण, टक्केवारीदेखील गुणपत्रिकेवर अंकित असेल. आता दिल्या गुणपत्रिकेवर शिक्षणाविषयी मोजकाच उल्लेख असल्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठात प्रवेशासाठी ही बाब अपुरी पडत असल्याचे विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च  न्यायालयात याचिकेद्धारे मांडली होती. त्याअनुषंगाने गुणपत्रिकेत बदल होणार आहे.उच्च शिक्षण संचालकांच्या बैठकीत निर्णयराज्याचे उच्च शिक्षण संचालक धनरािज माने यांनी सर्वच विद्यापीठाच्या गुणपत्रिकेत बदल करण्याच्या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी परीक्षा संचालकांसोबत बैठक घेतली होती. यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईनवर सांगोपांग चर्चा झाली. महाविद्यालयीन पदवी, पद्व्युत्तर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचा पॅटर्न एकसमान असण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार येत्या वर्षापासून गुणपत्रिकेत बदल होणार आहे. राज्यात विद्यापीठाच्या गुणपत्रिका समान असाव्यात, असे या बैठकीत ठरविण्यात आले. अकृषी विद्यापीठांना न्यायालयाचे नवे निर्देश लागू करण्यात आले. 

सीजीपी गुणपत्रिकेची विदेशात मागणीविदेशात उच्च शिक्षणासाठी अंतिम सत्राचे ग्रेड (सीजीपी) गुणपत्रिका आवश्यक असते. त्याअनुषंगाने गतवर्षी बी.एस्सी.चा एक विद्यार्थी सीजीपी गुणपत्रिकेच्या मागणीसाठी आला होता. मात्र, सीजीपी गुणपत्रिका विद्यापीठात लागू नव्हती. त्यामुळे सदर विद्यार्थी युरोपात उच्च शिक्षणासाठी जाऊ शकला नाही, अशी माहिती परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :universityविद्यापीठ