शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॅप्टन अशोक महाजनांनी केले होते भाकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:08 IST

देशाच्या सीमेचे दोन पिढ्यांपासून रक्षण करणारे धामणगाव येथील महाजन कुटुंबातील कॅप्टन अशोक महाजन यांनी सर्जिकल स्ट्राईकचे भाकीत केले होते. मंगळवार ते खरे ठरले. शहरातील माजी सैनिकांनी वायुसेनेने पाकला दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल जल्लोष केला.

ठळक मुद्देसर्जिकल स्ट्राईक, धामणगावात जल्लोष : सैनिकांचा तालुका म्हणून ओळख

धामणगाव रेल्वे : देशाच्या सीमेचे दोन पिढ्यांपासून रक्षण करणारे धामणगाव येथील महाजन कुटुंबातील कॅप्टन अशोक महाजन यांनी सर्जिकल स्ट्राईकचे भाकीत केले होते. मंगळवार ते खरे ठरले. शहरातील माजी सैनिकांनी वायुसेनेने पाकला दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल जल्लोष केला.कुटुंबापेक्षा देशसेवेला महत्त्व देणाऱ्या नारगावंडी येथील महाजन कुटुंबाची दुसरी पिढी सीमेवर तैनात आहे. तसाही धामणगाव हा सैनिकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. नारगावंडी येथील गोविंदराव महाजन हे ब्रिटिशांच्या काळात सैन्यात दाखल झाले होते. त्यांचा भारत-चीन युद्धात सहभाग होता. वडिलांपासून देशसेवेचे धडे घेऊन मोठा मुलगा अशोक महाजन हे वयाच्या एकविसाव्या वर्षी सैन्यात दाखल झाले. त्यांनी तब्बल ३४ वर्षे सीमेचे रक्षण केले. ते कॅप्टन म्हणून ओळखले जातात. त्यांचे धाकटे बंधू जगदीश महाजन हे एकोणिसाव्या वर्षी सैन्यात दाखल झाले. ते २० वर्षे पॅराशूट तुकडीमध्ये कार्यरत होते.धामणगाव तालुक्यात सुमारे सव्वाशे माजी सैनिक आहेत. कॅप्टन अशोक महाजन यांनी भारत-पाकिस्तान युद्धात कामगिरी बजावली होती. त्यांच्या नेतृत्वात बुधवारी धामणगाव शहरातील माजी सैनिकांनी जल्लोष साजरा केला. पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचे होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद समूळ नष्ट होईपर्यंत भारतीय सैनिक स्वस्थ बसणार नाहीत, असे मत कॅप्टन महाजन यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Soldierसैनिक